{"title":"सर्व पुस्तके ।  All Products","description":"","products":[{"product_id":"riya-and-the-red-book-adventure","title":"Riya and the Red Book adventure","description":"\u003cp\u003eRiya and the Red Book adventure\u003c\/p\u003eA birthday. A mysterious book. A race against time...\nOn the day she turns thirteen, Riya receives a strange and\nancient gift—a book with no words, only holes of different\nshapes and faded symbols. When Riya is swept into a\nmagical world of castles, secret doors, riddles, and danger.\nJoined by her friend, Hero, the horse, Riya must travel\nacross kingdoms to crack a riddle that will bring her back\nhome. Along the way, she makes friends and faces tricky\nbetrayals. With courage, cleverness and a big heart, she\ndiscovers that being a teen isn’t just about growing up—it's\nabout stepping up.\nWill Riya find her way back home\nbefore time runs out?","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":43067426603091,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_6a636f9b-1610-475b-a370-8c538995aebe.webp?v=1758614537"},{"product_id":"arogya-swarajya","title":"आरोग्य-स्वराज्य | Arogya-Swarajya","description":"\u003cp\u003eNew\u003c\/p\u003eस्वस्थ कोण ?\nजो ‘स्व’ मध्ये स्थित आहे, तो स्वस्थ म्हणजेच निरोगी.\nयाचा अर्थ आरोग्य स्वत:वर अवलंबून असते.\nजो स्वत:मध्ये स्थित नाही, तो अ-स्वस्थ म्हणजेच आजारी.\nरोगी दुसर्‍यांवर अवलंबून असतो.\n‘स्वस्थ’ शब्दामध्ये परावलंबनापासून स्वातंत्र्य हा अर्थ गर्भित आहे.\n‘स्वराज्य’ म्हणजे स्वत:चे राज्य नसून ‘स्व’वर राज्य, स्वत:चे नियंत्रण.\nस्वस्थ व स्वराज्य दोन्ही मिळून नवी संकल्पना तयार होते –\nआरोग्य-स्वराज्य !\nम्हणजेच आपल्या आरोग्यावर आपली सत्ता.\nव्यक्ती, कुटुंब, गाव व देश यांनी\nआरोग्य-स्वराज्य या मार्गावर वाटचाल कशी करायची ?\nसांगत आहेत, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. अभय बंग.","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310064211,"sku":null,"price":387.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_71bc871e-be2e-4f52-aea4-fc53a188349c.webp?v=1758614716"},{"product_id":"mi-alladiyakhan-by-ashwini-bhide-deshpande","title":"Mi...Alladiyakhan| मी...अल्लादियाखां By : Ashwini Bhide Deshpande| अश्विनी भिडे देशपांडे","description":"\u003cp\u003eNew\u003c\/p\u003eमरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब\nजयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते\nजणू ‘गायनाचे गौरीशंकर' !\nत्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी\nडॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी.\nख्यालगायनाच्या पद्धतीनुसार ‘रागबढत' किंवा ‘उपज'\nया अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा.\nत्यातून वाचकापुढे उलगडत जातं\nकधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं\nखांसाहेबांचं व्यक्तिमत्त्व,\nकधी त्यांच्या पारिवारिक आणि गुरुशिष्य नातेसंबंधांचं\nनाजूक, जरतारी विणकाम.\nविविध प्रसंगांतून उजागर होतात खांसाहेबांच्या\nव्यक्तिमत्त्वातल्या मनोहारी रंगछटा.\nएखाद्या कादंबरीसारख्या सुरस, रोचक घटनांनी भरलेलं\nहे खांसाहेबांचं ‘ललित चरित्र' म्हणजे\nरसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना\nलाभलेली शब्दमैफिलीची पर्वणी.","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310096979,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_92063ee8-d27e-4479-88a9-c389b365e344.webp?v=1758614718"},{"product_id":"i-am-not-alone","title":"आय ॲम नॉट अलोन | I Am Not Alone","description":"\u003cp\u003eNew\u003c\/p\u003eNo man is an island, says the poet John Donne.\nHe is part of a vast community of people. He lives,\ngrows up, interacts and matures within a community.\nAfter the mother's womb, it is the womb of the\ncommunity which matters the most. The community\naccommodates us, shapes our personality. It teaches us\nthe importance of sharing and social awareness. A life\nwithout a community is like a fish out of water.\nMy family, my village, school, church, parents,\nsiblings, friends, the priests I met, teachers, seminary,\nagitations, movements, the nature around me, trees,\nbirds and animals, mountains, streams, the sea,\nthey all surround me. So I am never alone...","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310162515,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_2620ac4e-6256-4c38-99a8-5db4421a829a.webp?v=1758614722"},{"product_id":"yuddha-nakarnare-jag","title":"युध्द नाकारणारे जग | Yuddha Nakarnare Jag","description":"\u003cp\u003eNew\u003c\/p\u003eयुद्धाला द्यायला हवा ठाम नकार...\nजगाला संघर्षांनी वेढलेले असताना युद्ध आणि शांतता यांचा सम्यक विचार\nकरणार्‍या या पुस्तकाचे महत्त्व अजोड आहे. संदीप वासलेकर हे आंतरराष्ट्रीय\nकीर्तीचे विचारवंत, ऑक्सफर्डचे स्कॉलर आणि ‘एका दिशेचा शोध' या १३\nवर्षांत २५ आवृत्त्या निघालेल्या राजहंसी पुस्तकाचे लेखक आहेत.\nयुद्धांमागील राजकारण, प्राणघातक शस्त्रास्त्रांच्या शर्यती, अतिरेकी राष्ट्रवादाचे\nदुष्परिणाम यांचा उदाहरणांसह परखड उहापोह या पुस्तकात वाचायला मिळेल.\nमानवी संस्कृती व सभ्यता यांच्या विनाशाची शक्यता संहारक युद्धांमुळे वाढत\nचालली आहे, हे सत्य सुस्पष्टपणे मांडले आहे. सर्वनाश टाळायचा तर मानवी\nसमाजाने एकत्र येऊन आणि राजकीय नेत्यांना बाजूला ठेवून ठामपणे युद्धांना\nनकार दिला पाहिजे, असा लेखकांचा निष्कर्ष आहे. त्यासाठी त्यांनी\nआंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचा योग्य\nपरामर्श घेतला आहे.\nयुद्ध हा मानवजातीचा नैसर्गिक गुणधर्म नाही. शांतता व युद्ध यातून शांततेची\nनिवड करण्याची मुभा आपल्याला आहे, असे हे पुस्तक ठामपणे बजावते.\nएकीकडे धोक्याचा इशारा आणि दुसरीकडे विचारांना चालना हे त्याचे वैशिष्ट्य.","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310326355,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_4fd2b532-df87-4f72-a17b-73ef60cca809.webp?v=1758614724"},{"product_id":"udyog-yashogatha","title":"उद्योग यशोगाथा | Udyog Yashogatha","description":"\u003cp\u003eUdyog Yashogatha | उद्योग यशोगाथा\u003c\/p\u003e‘उद्योग यशोगाथा' या पुस्तकाबद्दल डॉ. अनंत सरदेशमुख यांचे हार्दिक अभिनंदन.\nऔद्योगिक क्षेत्रातील व्यापक अनुभव, उद्योजकांसोबतचे दीर्घकाळाचे संबंध,\nऔद्योगिक क्षेत्राचा प्रदीर्घ अभ्यास यातूनच डॉ. सरदेशमुखांना व्यावसायिक यशाचे\nमर्म जाणून घेता आले. अनुभव, अभ्यास व निरीक्षणातून ते एक परिणामकारक\nदृष्टिकोन प्रस्तुत करू शकले. विविध औद्योगिक क्षेत्रातील आठ यशकथांचे\nबनलेले हे पुस्तक केवळ उद्योजकीय उत्कृष्टतेचा गौरवच नव्हे, तर उद्योजकतेची\nआकांक्षा बाळगणार्‍या भावी व्यावसायिक नेत्यांसाठी प्रेरकही आहे.\nभारताच्या गतिमान, देदीप्यमान स्टार्टअप परिसंस्थेच्या आणि वेगाने विकसित\nहोणार्‍या उद्योग-अर्थव्यवस्थेच्या संदर्भात ‘उद्योग यशोगाथा' पुस्तकाने योग्य वेळ\nसाधली आहे. त्याचा प्रभाव उभरत्या उद्योजकांवर नक्कीच पडेल.\nशाश्वत प्रगतीला पायाभूत प्रेरणा, पुढाकार, चिकाटी, नवनिर्मिती या मूल्यांचा\nसमावेश या उद्योग यशोगाथेत आलेला आहे. अवश्य वाचनीय पुस्तक.\nसंजय किर्लोस्कर\nअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, किर्लोस्कर ब्रदर्स लि.\nअध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310359123,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_5bce5c42-9824-415a-81bb-7fbeaa22675c.webp?v=1758614726"},{"product_id":"ghumakkadi","title":"घुमक्क्डी | Ghumakkadi","description":"\u003cp\u003eGhumakkadi | घुमक्क्डी\u003c\/p\u003eसरधोपटता वजा केली,\nकी तुम्हाला थोडं अधिक चांगलं लिहिता येऊ शकतं,\nहे नोरा एफ्रॉन या विदुषीचं तत्त्वज्ञान कविता महाजन यांनी\nत्यांच्या कथात्म लेखनकाळातच ओळखलं होतं.\nअकथनात्मक लेखन, अनुवादासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातील\nलेखक-लेखिकांचं वाचन, संपादन\nया सर्व बाबींमुळे त्यांच्या लेखणीला धार आलेली दिसते.\nरा. भि. जोशींच्या प्रवासलेखनकुळाशी\nबरंचसं जवळचं नातं सांगणार्‍या\n‘घुमक्कडी' या पुस्तकामध्येही आहे\nप्रवासाच्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास.\nतो किती खोलवर आहे,\nयाचा अंदाज यातील कोणताही लेख वाचल्यानंतर उमजून येईल.\nपृथ्वीची उत्पत्ती, सूर्याची, अग्नीची, पावसाची इतकंच नाही,\nतर मिठाची उत्पत्ती याबद्दलच्या लोककथांचा प्रवास\nकविता महाजनांच्या प्रवासाशी एकरूप होऊन\nरूढार्थानं प्रवासवर्णन नसलेलं\nएक अचंबित करणारं पुस्तक तयार झालंय.\nब्लॉगसाठी लिहिल्या गेलेल्या या प्रवासनोंदी,\nपण अत्यंत गंभीर आणि अनंत तपशिलांना कवेत घेणार्‍या.","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310391891,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_3cbfd5b1-91e6-4c2e-a75b-7bdfd3c3e6f1.webp?v=1758614728"},{"product_id":"goshta-reserve-bankechi","title":"गोष्ट रिझर्व्ह बँकेची | Goshta Reserve Bankechi","description":"\u003cp\u003eGoshta Reserve Bankechi | गोष्ट रिझर्व्ह बँकेची\u003c\/p\u003eशेतकर्‍यांपासून कामगारांपर्यंत, उद्योगपतींपासून गृहिणीपर्यंत,\nअगदी नोकरदारापासून संतमहंतांपर्यंत\nप्रत्येकाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष बँकेशी संबंध येतोच.\nजशी व्यक्तीची अथवा संस्थेची कुठली ना कुठली बँक,\nतशी बँकांची बँक, सार्‍या देशाची बँक म्हणजे\nभारतीय रिझर्व्ह बँक.\nकधी स्थापन झाली ही बँक ?\nकसा झाला या बँकेचा आजवरचा प्रवास ?\nस्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात\nकाय होती या बँकेची भूमिका अन् कार्यपद्धती ?\nदेशातील सरकार, प्रशासन, अर्थव्यवस्था अन्\nसामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यापासून\nदीर्घकालीन परिणामांपर्यंत\nअनेक घटकांवर परिणाम करणार्‍या धोरणांची\nआखणी करणारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक.\nभारतासारख्या खंडप्राय विशाल देशाच्या वाटचालीत\nमहत्त्वपूर्ण सहभाग असणार्‍या रिझर्व्ह बँकेचा\nरोचक इतिहास अत्यंत रंजक पद्धतीने सांगत आहेत\nसुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विद्याधर अनास्कर.\nगोष्ट रिझर्व्ह बँकेची","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310424659,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_2c2d125e-eda5-4cbc-b4b0-3e276979c0f5.webp?v=1758614730"},{"product_id":"katha-shivchitranchya-vyatha-shivasmarakachya","title":"कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या ! | Katha Shivchitranchya, Vyatha Shivasmarakachya","description":"\u003cp\u003eKatha Shivchitranchya, Vyatha Shivasmarakachya | कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या !\u003c\/p\u003eभारतीय इतिहासाला निर्णायक राष्ट्रीय वळण लावणारे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !\nत्यांचे व्यक्तिमत्त्व समाजाला नेहमीच प्रेरणा देत आले. मध्यंतरीचा काही काळ सोडला,\nतर सतत त्यांची प्रतिमा देशीविदेशी कलाकारांना आव्हान देत आली, आवाहन करीत आली.\nअसंख्य चित्रकारांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले अगणित चित्तथरारक, रोमहर्षक प्रसंग चितारले;\nतर कित्येक शिल्पकारांनी कधी अर्धाकृती, कधी पूर्णाकृती, तर कधी अश्वारूढ शिवाजी महाराज घडवले.\nत्यांच्या त्या त्या कलाविष्कारामागे दडलेल्या संघर्षकथासुद्धा तितक्याच लक्षणीय आहेत.\nकुणाची स्वप्ने साकार झाली, गौरवली गेली; तर कुणाकुणाची स्वप्ने भंग पावली, अधुरी राहिली.\nअशा असंख्य कथांचे आणि तशाच व्यथांचे हे अनोखे संकलन.\nसर्वांच्या केंद्रस्थानी आहेत, ते मात्र\nहिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज !\nभारतीय कलेतिहासाचे साहित्यिक जतन-संवर्धन करण्याचा\nध्यास घेतलेल्या सुहास बहुळकरांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकथी\nशैलीतले हे पुस्तक म्हणजे इतिहास, चित्रकला आणि शिल्पकला\nया तिन्ही क्षेत्रांतील असंख्य मान्यवरांच्या अतुलनीय\nकार्यकर्तृत्वाला दिलेली मानवंदनाच आहे !","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310457427,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_adc97c1a-4a0f-4414-8baf-0736b33f3a26.webp?v=1758614735"},{"product_id":"kahani-ghargruhasthichee","title":"कहाणी घरगृहस्थीची | Kahani Ghargruhasthichee","description":"\u003cp\u003eKahani Ghargruhasthichee | कहाणी घरगृहस्थीची\u003c\/p\u003eहे पुस्तक वाचायला घेताना कोणत्याही पूर्वकल्पना मनात न ठेवलेल्या बर्‍या,\nकारण यातली सगळी स्फुटं तशी एकमेकांशी जोडलेली असली, तरी स्वतंत्र आहेत.\nत्यांचा एखादा विशिष्ट असा ढाचा नाही.\nआयुष्य सजगपणे आणि भरभरून जगताना मनात आलेले विचार, भावना, कल्पना,\nकधी घेतलेले काही निर्णय, अवतीभोवतीची माणसं, त्यांचं वागणं,\nवेगवेगळी परिस्थिती असं सगळंच दिसतं यात.\nत्यांचं एक मिश्रण, नव्हे, रसायन बनतं.\nआपली आयुष्यं असतात तशी बहुरंगी, बहुढंगी.\nआपण त्याकडे जाणीवपूर्वक बघत असलो, तर खूप काही हाती गवसतं.\nमला जे गवसलं, ते मला मांडावंसं वाटलं.\nअसंच अनेकांनी लिहिलं, तर ‘घरगृहस्थी' नावाचं एक भव्य कोलाज सहज बनू शकेल\nआणि ते अतिशय वेधक अन् रंजकही होईल.\nहे वाचून वाचणारे लिहिते झाले, तर मला भरून पावलं, असं मी म्हणेन.\nसरोज देशपांडे","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310490195,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_e3bbdde7-0fbc-4949-afdf-6340dda64cf9.webp?v=1758614736"},{"product_id":"vastavikateche-rang","title":"वास्तविकतेचे रंग | Vastavikateche Rang","description":"\u003cp\u003eVastavikateche Rang | वास्तविकतेचे रंग\u003c\/p\u003eही कहाणी आहे आजच्या काळाची,\nभोवतालच्या वर्तमानाची अन्\nया वर्तमानात वावरणार्‍या व्यक्तींची,\nसमाजाची, जनसमूहाची आणि जनमानसाची.\nही कहाणी आहे एका धैर्यवान मुलीची.\nप्रतिकूल परिस्थितीत जन्म, पण तिच्यावर मात करणारी जिद्द.\nशिक्षणाने दिलेली क्षमता अन् सामर्थ्य.\nत्यातून लाभलेल्या आत्मविश्वासातून ती लढायला शिकली.\nलढा जातिभेदाशी. लढा लोकांच्या पूर्वग्रहांशी.\nआपली स्वप्नं वास्तवात आणताना येणार्‍या अडथळ्यांशी.\nआपलं भविष्य घडवताना त्याला डागाळणार्‍या वर्तमानाशी.\nया लढ्यात तिला यश मिळालं का ?\nया लढ्यात तिला आपल्या जोडीदाराची किती साथ मिळाली ?\nकी वर्तमानातल्या विटक्या रंगांनी तिच्या\nस्वप्नांना डागाळून टाकलं ?\nआजच्या समस्यांची गुंतागुंत उलगडत\nव्यामिश्र वर्तमानाचा वेध घेणारी कादंबरी","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310555731,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_3d46e5e3-5349-4031-ae5c-6677a27953cd.webp?v=1758614739"},{"product_id":"manik-moti-mani-varma-ani-parivar","title":"माणिक मोती - माणिक वर्मा आणि परिवार | Manik Moti - Mani Varma Ani Parivar","description":"\u003cp\u003eManik Moti - Mani Varma Ani Parivar | माणिक मोती - माणिक वर्मा आणि परिवार\u003c\/p\u003e‘माणिक वर्मा' असे नाव उच्चारले की,\nकानामनात रुणझुणू लागतात\nअसंख्य भावगीते, भक्तिगीते अन् नाट्यगीते.\nशास्त्रीय संगीतातही आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान\nत्यांनी निर्माण केले होते.\nसंगीतक्षेत्रात त्यांनी जशी लखलखती कारकीर्द साकारली,\nतसाच स्वतंत्र ठसा वर्मा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने\nआपापल्या कार्यक्षेत्रात उमटवला.\nमाणिकताईंचे पती अमर वर्मा हिंदी आणि\nउर्दूचे ख्यातकीर्त शायर.\nदोन कन्या - भारती आचरेकर अन् वंदना गुप्ते\nसुप्रसिद्ध अभिनेत्री,\nतर तिसरी कन्या राणी वर्मा नामवंत गायिका.\nचौथी कन्या अरुणा जयप्रकाश नामांकित फिजिओथेरपिस्ट.\nसंपूर्ण वर्मा परिवार म्हणजे जणू विविध कलाक्षेत्रांमध्ये\nलाखो रसिकांच्या हृदयात अढळ स्थान\nमिळवणारी अनमोल रत्ने.\nमाणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त\nया समग्र परिवाराच्या कलाकर्तृत्वाचा वेध घेणार्‍या\nस्मृतिचित्रांचा वेधक शब्दपट -","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310588499,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_adbc50ba-e1c8-4f94-8ca3-0af74fb6299e.webp?v=1758614741"},{"product_id":"shordh-badaltya-pruthvicha","title":"शोध बदलत्या पृथ्वीचा | Shordh Badaltya Pruthvicha","description":"\u003cp\u003eShordh Badaltya Pruthvicha | शोध बदलत्या पृथ्वीचा\u003c\/p\u003eआपल्या पृथ्वीची निर्मिती झाली सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी.\nजन्मापासून आजपर्यंत तिच्या प्रकृतीत सततचे बदल चालूच आहेत.\nतिच्या अंतरंगात चाललेल्या प्रचंड घडामोडींचा\nआणि त्यामुळे तिच्या प्राकृतिक घटकांमध्ये अन् बाह्य रूपामध्ये होणार्‍या\nबदलांचा शोध अन् वेध घेणं ही कधीही न संपणारी गोष्ट !\nकोट्यवधी वर्षांपासून चालू असलेल्या या बदलांना कारणीभूत असलेल्या\nज्वालामुखी, भूकंप, सुनामी, चक्रीवादळे यांसारख्या\nप्रचंड उलथापालथींबाबतची शास्त्रीय माहिती\nजिज्ञासू वाचकाला रंजक आणि सुबोध पद्धतीने स्पष्ट करून सांगणारे -","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310621267,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_df0cb439-7cd6-4e30-99e4-15bef83f34ef.webp?v=1758614743"},{"product_id":"ek-ulat-ek-sulat-bhag-2","title":"एक उलट ...एक सुलट : भाग २ | Ek Ulat.. Ek Sulat : Bhag 2","description":"\u003cp\u003eEk Ulat.. Ek Sulat : Bhag 2 | एक उलट ...एक सुलट : भाग २\u003c\/p\u003eहे एका शहाण्या मुलीचं मर्मस्पर्शी लिखाण आहे.\nतिच्यासाठी तिचं लेखन ही एक शोधाची वाट आहे.\nतिच्यामध्ये एक अतिशय उत्कट अशी शिकणारी मुलगी आहे.\nती तिच्या लिखाणामधून स्वत:ला वाढवायला बघते.\nइतकी वाढण्याची धडपड मला फार कमी माणसांमध्ये दिसते.\nतिच्यात सतत एक ऊर्मी आहे, सतत एक उत्साह आहे.\nमोठ्ठा हात पसरून एखाद्या मुलीनी यावं ना,\n‘हे सगळं मला हवंय!’ असं म्हणत,\nतशी मला अमृता तिच्या लिखाणातून दिसते.\nएकूणच जीवन समजून घेण्याची या मुलीला फार असोशी आहे.\nशिवाय विचारपूर्वक जगण्याचं भान आहे आणि\nअशा जातीच्या माणसांना कायम अतृप्त, अस्वस्थ राहण्याचा\nएक शाप किंवा वर असतो.\nतोही तिला मिळालेला आहे, असं मला वाटतं.\nतिच्याभोवती घरीदारी नाटक, सिनेमा, चित्रं, संगीत, गाणं, नाचणं\nया सगळ्यांनी झणकारणारं वातावरण आहे आणि\nया झणकारणार्‍या वातावरणामध्ये ती स्वत:चा आवाज लावू पाहतीये.\nअतिशय प्रामाणिक आणि उत्कट अशा मुलीचा तो आवाज आहे\nआणि अमृता, तुझा आवाज आम्हाला छान ऐकू येतोय.\nडॉ. अरुणा ढेरे","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310654035,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_91ceee2d-b7a0-460d-8f2f-e9b04c4d0880.webp?v=1758614746"},{"product_id":"sanghatil-manavi-vyavasthapan-eka-swayamsevakachya-najaretun","title":"संघातील मानवी व्यवस्थापन - एका स्वयंसेवकाच्या नजरेतून | Sanghatil Manavi Vyavasthapan Eka Swayamsevakachya Najaretun","description":"\u003cp\u003eNew\u003c\/p\u003eरा. स्व. संघाच्या शाखांतून तयार झालेल्या स्वयंसेवकांनी आवडीची कार्यक्षेत्रे\nनिवडली. त्यात संघाच्या संस्कारबळावर विविध संस्थात्मक, संघटनात्मक कार्ये उभी\nकेली. शिक्षण, संस्कार, कामगार, विद्यार्थी, उद्योग, आरोग्य, राजनीती अशा क्षेत्रांत\nआणि विविध सेवाकार्यांत संघस्वयंसेवकांनी कार्य केले आणि हाच शक्तिसाठा\n‘संघपरिवार’ म्हणून ख्यातनाम झाला.\nमंत्र छोटा, तंत्र सोपे । परि यशस्वी ठरले ते ।।\nरीत साधी, शिस्त बांधी । कार्य व्यापक उभवी ते ।।\nया संघगीताचा साक्षात्कार आज सार्‍या विश्वाला होत आहे. तरीही संघ समग्रपणे\nसमजला, असे म्हणता येईल का ? कारण रोज माझ्या अवतीभवती वावरणारा,\nमाझ्यासारखाच हा सामान्य माणूस, आश्चर्याने तोंडात बोट घालावे असे उत्तम कार्य\nकसा करू शकला बुवा, हे मनात येतेच. या आश्चर्यावर मात करून संघातील मानवी\nव्यवस्थापन बारकाईने न्याहाळले तर ‘सामान्य माणसातल्या असामान्य क्षमता फुलवून\nमोठाली कामे करणारी संघटना म्हणजे रा. स्व. संघ’ हा बोध आपल्याला होतो.","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310686803,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_90d9f0c6-c757-49c2-83a4-831e56875e4c.webp?v=1758614747"},{"product_id":"tyanantar","title":"त्यानंतर ... | Tyanantar ...","description":"\u003cp\u003eNew\u003c\/p\u003eमराठी कवितेच्या प्रवासातील सुमारे पाच\nदशकांहून अधिक काळ व्यापून असलेले,\nमराठी कवितेला वेगळे वळण\nआणि परिणामकारक बळ देणारे\nम्हणून समजले गेलेले कवी म्हणजे\nश्रीपाद भालचंद्र जोशी !\n‘सळाळ आणि सळाळनंतर...’, ‘समांतर’,\n‘मथितार्थ’ व ‘इत्यादि’ या कवितासंग्रहांनंतरचा\nत्यांचा हा पाचवा कवितासंग्रह.\nगेल्या अर्धशतकातील वेगाने बदलत्या जीवनाच्या\nसार्‍याच पातळ्या, आयाम, बाजू, संबंध, गुंतागुंत\nसमग्रपणे कवेत घेणार्‍या,\n‘मोठ्या समाजमनाचे प्रतिंबिंब’ अन्\n‘मोठ्या कालखंडाचा कॅनव्हास’ घेऊन\nकाव्यकृती साकारणार्‍या या कवीचा काव्यप्रवास\nशैली, आशय व चिंतनदृष्ट्या आपल्या\nवेगळेपणाने नजरेत भरतो आहे.","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310752339,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_26ca1a8b-e355-4dff-8e13-79e6393f1a95.webp?v=1758614750"},{"product_id":"sobat-sanjvelchee","title":"सोबत सांजवेळची | Sobat Sanjvelchee","description":"\u003cp\u003eNew\u003c\/p\u003eआपल्यापैकी बहुतेकजण मृत्यूला,\nविशेषत: वेदनादायी मृत्यूला घाबरतात.\nपरंतु आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना\nज्यांनी अत्यंत अवघड वाटणारे पर्याय स्वीकारले,\nअशा सामान्य व्यक्तींच्या, असामान्य जीवनस्पर्शी कथा\nडॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी अगदी सहज सोप्या भाषेत\nअन् अत्यंत अनुकंपेने आपल्यासमोर आणल्या आहेत.\nत्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग, त्यातील गूढता, ताणतणाव\nआणि त्याचबरोबर दिलासा देणारा हळुवार स्पर्श\nहे सर्व खरोखरीच मनाला भावून जाते.\nत्यांचे हे हृदयस्पर्शी पुस्तक वाचल्यानंतर\nमी मृत्यूला सामोरी जायला तयार आहे आणि\nकदाचित मी त्याचा अगदी शांतपणे स्वीकार करू शकेन,\nअसे मला वाटते.\nअनु आगा","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310785107,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_15934e1e-b7ad-49a6-8edb-566f18ad827a.webp?v=1758614752"},{"product_id":"chhata-galot","title":"छतं गळोत | Chhata Galot","description":"\u003cp\u003eNew\u003c\/p\u003eश्रीधर देशपांडे यांचं भावविश्व\nकवितेच्या अंगभूत वृत्तींनी व्यापलेलं आहे.\nत्यात स्वगतं आहेत, स्वत:ला पडणारे प्रश्न आहेत,\nअसण्या-नसण्यातल्या भीतीचं भिरभिरलेपण आहे,\nजगण्यातल्या विरामचिन्हांच्या नोंदी, प्रार्थना आहेत,\nआटलेल्या मायेच्या स्मृती आहेत - असं बरंच काही आहे.\nकुठल्याही संकटांत प्रेमाचे बंध टिकोत,\nछपरं गळोत; पण पाठीशी भिंत असो\nआणि आटल्या मायेला पूर येवो,\nअसं साकडं घालणारी ही कविता आहे.\nया कविता वाचताना आपल्याही मनात प्रार्थना उमटतात.\nज्यातून शुष्कतेला ओल मिळो,\nघराच्या पायाला नजर न लागो, पक्ष्याला घर लाभो -\nअसं वाटत राहतं.\nगणेश विसपुते","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310817875,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_9e9f3b4e-8dc0-4854-b61f-bec04a1be709.webp?v=1758614754"},{"product_id":"64-gharanchya-goshtee","title":"६४ घरांच्या गोष्टी | 64 Gharanchya Goshtee","description":"\u003cp\u003eNew\u003c\/p\u003eतुम्हाला बुद्धिबळ खेळणे आवडत असेल,\nतर तुम्ही या पुस्तकाच्या नक्की प्रेमात पडाल !\nतुम्हाला बुद्धिबळाबद्दल फारशी जाण नसेल,\nतर मात्र तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे !\nबुद्धिबळाच्या क्षेत्रातील अनेक रसभरित गोष्टी\nतुम्हाला या पुस्तकाशी जखडून ठेवतील.\nबुद्धिबळाच्या विविध वैशिष्ट्यांचा,\nबुद्धिबळाच्या इतिहासातील अज्ञात वळणांचा,\nखेळाडूंच्या अप्रतीम कर्तृत्वाचा,\nअगदी चित्रपटातून दिसलेल्या बुद्धिबळक्षेत्राचा\nमागोवा घेत हे पुस्तक बुद्धिबळाच्या जगाची\nएक रोचक सफर घडवते.\nबॉबी फिशर, विश्वनाथन आनंद,\nमॅग्नस कार्लसनपासून गुकेश, हंपीपर्यंत\nनानाविध खेळाडूंची भेट घडवणार्‍या -","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310883411,"sku":null,"price":428.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_8ac283bb-6e38-41f3-8463-c657a5768df1.webp?v=1758614756"},{"product_id":"skalpel-te-skopee-te-robo","title":"स्कालपेल ते स्कोपी ते रोबो | Skalpel Te Skopee Te Robo","description":"\u003cp\u003eSkalpel Te Skopee Te Robo | स्कालपेल ते स्कोपी ते रोबो\u003c\/p\u003eही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रुताची.\nसुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. शैलेश पुणतांबेकर\nयांच्या चतुरस्र कार्याची.\nअसंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे,\nजगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन\nशल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन\nआणि शस्त्रक्रिया करणारे,\n‘पुणे टेक्निक' हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे,\nख्यातनाम सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या\nअनोख्या प्रवासाचा घेतलेला वेध.","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310948947,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_23566b0e-44ef-43e0-bd72-e9b317c537f3.webp?v=1758614758"},{"product_id":"chhotyancha-motha-plan-ani-itar-goshtee","title":"छोट्यांचा मोठा प्लॅन आणि इतर गोष्टी | Chhotyancha Motha Plan ani Itar Goshtee","description":"\u003cp\u003eChhotyancha Motha Plan ani Itar Goshtee | छोट्यांचा मोठा प्लॅन आणि इतर गोष्टी\u003c\/p\u003eजे बालसाहित्य मुलांना वाचायला आवडते, पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते,\nते उत्तम बालसाहित्य. असे बालसाहित्य लिहिण्यासाठी मुलांचे मन वाचता येणे\nआणि ते अचूकपणे शब्दांत मांडता येणे फार अवघड आहे.\nपण ही अवघड गोष्टच अगदी सोप्या पद्धतीने मुग्धा शेवाळकर करतात.\nत्यांच्या ‘निसर्गातले सखेसोबती' या पुस्तकातून त्याचा प्रत्यय\nआपल्याला येतोच. लेखन, अनुवाद आणि पुस्तकवितरण क्षेत्रात कार्यरत\nअसणार्‍या आणि खास करून मुलांसाठी विविध वृत्तपत्रांतून लेखन करणार्‍या\nमुग्धा शेवाळकर छोट्या दोस्तांच्या भेटीला आल्या आहेत नवीन बालकथासंग्रह घेऊन !\nही भेट मुलांसाठी नक्कीच आनंददायी ठरणार.\nया सर्वच गोष्टी मुलांच्या भावविश्वाशी सांगड घालणार्‍या, मुलांच्या भाषेतून अवतरणार्‍या,\nउपदेशपणा बाजूला सारणार्‍या आणि आनंदासोबतच नकळत मूल्यसंवर्धनही\nकरणार्‍याही आहेत. म्हणूनच या गोष्टींचे मोल बालसाहित्यात अनमोल आहे !\nएकनाथ आव्हाड - साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270310981715,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_a5c84d09-7f84-452c-80a1-bff0ecf50821.webp?v=1758614760"},{"product_id":"eka-yashasvi-urologistchi-vatchal","title":"एका यशस्वी युरोलाॅजिस्टची वाटचाल | Eka Yashasvi Urologistchi Vatchal","description":"\u003cp\u003eEka Yashasvi Urologistchi Vatchal | एका यशस्वी युरोलाॅजिस्टची वाटचाल\u003c\/p\u003eडॉ. शरद बापट यांच्या ९३ वर्षांच्या आयुष्याने\nसातारा, लाहोर, पुणे, अहमदाबाद, लंडन, मुंबई असा प्रवास केला आहे.\nपण हे पुस्तक म्हणजे निव्वळ डॉ. बापट यांचे आत्मकथन नाही.\nयुरोलॉजी या वैद्यकीय शाखेच्या भारतातील वाटचालीचाही हा आलेख आहे.\nपूर्ण देशात ज्यांनी एंडोस्कोपिक युरोलॉजीचा पाया घातला,\nत्यात डॉ. बापट अग्रगण्य आहेत. मुंबईच्या सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेतील\nयुरोलॉजीचा पहिला स्वतंत्र बाह्यरुग्णविभाग त्यांनी सायन इस्पितळात सुरू केला.\nशिक्षक म्हणून युरोलॉजिस्टांच्या चार पिढ्या त्यांनी घडवल्या.\nमूत्रपिंड आरोपणाच्या तंत्रावर हात बसावा म्हणून\nत्यांनी कुत्र्यांवर दोन वर्षे प्रयोग केले होते.\nतर अलिकडे रोबोटिक कॉन्सोल शस्त्रक्रियेचे तंत्र\nभारतात आणण्यातही त्यांचा पुढाकार होता.\nगेल्या ६० वर्षांतल्या या अचाट तांत्रिक प्रगतीचा प्रवास\nइथे सोप्या शैलीत उलगडून दाखवला आहे.\nत्याचबरोबर, वाढलेल्या प्रोस्टेटपासून लघवीची जळजळ होणे\nअशा नेहमीच्या तक्रारींवरच्या उपचारांचे अनुभव आणि\nत्याबाबतची निरीक्षणेही यामध्ये रंजकपणे मांडलेली आहेत.\nसामान्य वाचकांपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल,\nअसा हा दस्तावेज आहे.","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311014483,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_4211eba6-8a59-4149-a59a-050aff1e0078.webp?v=1758614763"},{"product_id":"dehabhan","title":"देहभान | Dehabhan","description":"\u003cp\u003eDehabhan | देहभान\u003c\/p\u003eमानवी नात्यांमधला लैंगिकता हा मूलभूत पैलू.\nआजची तरुणाई त्याकडे कशी बरं बघते?\nउत्तम सहजीवनासाठी नेमकं काय करायला हवं?\nविवाहपूर्व लैंगिक समुपदेशन का हवं?\nसुखी संसाराचं गुपित काय?\nबदलत्या जीवनशैलीमुळे\nलैंगिकतेवर परिणाम झाले आहेत का? ते कोणते?\nत्या समस्यांना कसं तोंड द्यायचं?\nज्येष्ठांचं सहजीवन हा दुर्लक्षित राहिलेला विषय.\nत्याचं महत्त्व काय?\nहे आणि असे अनेक प्रश्न...\nसर्व वयोगटाला पडणारे...\nते कोणाला विचारायचे?\nया प्रश्नांची शास्त्रीय पद्धतीनं उत्तरं देणारं हे पुस्तक.\nया विषयातले वैद्यकीय तज्ज्ञ, समुपदेशक,\nस्वयंसेवी संस्थांमधले कार्यकर्ते यांच्याशी\nसंवाद साधून, संशोधनांचा अभ्यास करून लिहिलेलं,","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311047251,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_ad6af05b-b487-4d0e-9709-08ce31c2aa40.webp?v=1758614765"},{"product_id":"lokshashi-ani-hukumshashi","title":"लोकशाही आणि हुकुमशाही | Lokshashi Ani Hukumshashi","description":"\u003cp\u003eLokshashi Ani Hukumshashi | लोकशाही आणि हुकुमशाही\u003c\/p\u003eआदरणीय नरेंद्रजी चपळगावकर यांचा आपल्या सर्वांचे प्रबोधन\nकरणारा एक ग्रंथ आपल्या भेटीसाठी येत आहे. ते लोकशाही समाजवाद व\nगांधीवादाचे पुरस्कर्ते व अभ्यासक आहेत. विचारस्वातंत्र्यासाठी आपल्या\nलेखणीने व वाणीने त्यांनी लढा दिला आहे. साहित्यसंमेलनातील\nविचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे त्यांचे भाषण अविस्मरणीय होते.\nअनेकांना हे भाषण ऐकून कै. दुर्गाबाई भागवतांच्या प्रसिद्ध भाषणाची\nआठवण झाली. चपळगावकर यांचे लेखन व त्यांची भाषणे अतिशय संयत व\nसमतोल असतात. ते विचार स्पष्टपणे मांडतात, पण त्यात अभिनिवेश\nनसतो. ते कधीही दुसर्‍याच्या मताचा अनादर करीत नाहीत. सध्याचा काळ\nहा आक्रस्ताळेपणाने विचार व्यक्त करण्याचा व न पटणार्‍या विचारांचा\nअवमान करण्याचा काळ आहे, असे कधीतरी वाटते. या काळात\nचपळगावकरांचे लेखन व त्यांची भाषणे फार आशादायक वाटतात.\nलोकशाही समाजवाद व गांधीवादाचे ते नुसतेच पुरस्कर्ते नाहीत, तर ते\nविचार ते प्रत्यक्षपणे आचरणात आणतात. लोकशाही संस्कृतीचा पुरस्कार\nकरणार्‍यांना त्यांचे लेखन आशेच्या किरणासारखे वाटते.\nन्या. अभय ओक,\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश\nलोकशाही आणि हुकुमशाही","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311080019,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_49967436-4dbe-45ac-a90b-17d65111b09b.webp?v=1758614768"},{"product_id":"bhimsen","title":"भीमसेन | Bhimsen","description":"\u003cp\u003eBhimsen | भीमसेन एक सच्चा, सत्वशील सूर भीमसेन भारतीय जनसंस्कृतीच्या महासागरात विरघळून गेलेला एक सुरेल प्रवाह. त्यांची गायकी जेवढी अदभुत तितकीच त्यांची जीवनकथाही अकल्पित.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअशा या नाटयपूर्ण जीवनाची आणि अविश्वसनीय वाटेल अशा गानकर्तृत्वाची ही चरित्र मैफल. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311112787,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bhimsen.jpg?v=1759042549"},{"product_id":"pakisthan-ka-matlab-kya","title":"पाकिस्तान का मतलब क्या ? | Pakisthan ka Matlab Kya ?","description":"\u003cp\u003ePakisthan ka Matlab Kya ? | पाकिस्तान का मतलब क्या ? पाऊणशे वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतरही एखाद्या देशाला आपल्या अस्तित्वाच्या अर्थाचा प्रश्न पडावा का?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eपण, पाकिस्तानला तो पडतोय. ‘पाकिस्तान का मतलब क्या? हा प्रश्न आजही तेथे विचारला जातो; उत्तरासाठी इस्लामचा आधार घेतला जातो; मात्र तेथेही उत्तर मिळत नसल्याने कडवा भारतविरोध जोपासला जातो. धर्म आणि भारतविरोध यांच्या चौकटीतच आपले अस्तित्व टिकविण्याच्या नादात पाकिस्तानची फसगत झालीय.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eधार्मिक ओळख कमी करावी, तर वेगळेपण काय राहील याची भीती आणि भारतविरोधाची धार सौम्य करावी, तर मग भारतापासून वेगळे का झालो हा प्रश्न. आपल्या अस्तित्वाला या दोन घटकांभोवती केंद्रीत करण्याच्या नादात पाकिस्तान एका चक्रव्यूहात फसला आहे. अस्मितेच्या वावटळीत फसलेल्या देशाच्या आजवरच्या प्रवासाचा वेध. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311145555,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_c1cc3223-9450-4c27-93f9-7723f458a272.webp?v=1758614771"},{"product_id":"suranchi-samaradnee-lata-mangeshkar","title":"Suranchi Samaradnee Lata Mangeshkar | सुरांची सम्राज्ञी लता मंगेशकर","description":"","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311178323,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_51d2220c-07d3-4912-8930-bbac173a8b26.webp?v=1758614773"},{"product_id":"chirtarun-swar-asha-bhosale","title":"चिरतरूण स्वर : आशा भोसले | Chirtarun Swar - Asha Bhosale","description":"\u003cp\u003eChirtarun Swar - Asha Bhosale | चिरतरूण स्वर : आशा भोसले आशा भोसले हे नाव आठवण करून देतं, श्रावणातल्या इंद्रधनुष्याची... ज्यातला प्रत्येक रंग म्हणजे शब्द-सूर-अर्थ-रस-भावांची अप्रतिम विविधता! आर्त प्रेमापासून दम मारण्यापर्यंतची गाणी..\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eभजनं, भक्तिगीतं, प्रेमगीतं, नाट्यसंगीत, क्लब डान्स साँग्ज अन् कॅब्रे साँग्ज, कव्वाली, लावणी नि कोळीगीतं... गाण्याचं असं एकही अंग नाही, ज्याला आशाताईंच्या सुरेल गळ्याचा परिसस्पर्श झाला नाही... या पुस्तकात रसिक संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर आपल्याला घेऊन जातायत आशाताईंच्या गानखजिन्यात!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआशाताईंच्या गायनकलेच्या जादूचा परिचय आणि मग त्यांची निवडक पंचवीस हिंदी-मराठी गाणी आणि त्यांचा रसास्वाद... अन् क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधा! हिंदी चित्रपटसंगीताच्या आणि आशाताईंच्या चाहत्यांसाठी, चुकवू नये अशी मैफल... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311211091,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_50081ce4-4531-46a2-8385-b9ffcc1475f3.webp?v=1758614775"},{"product_id":"aiwaj-vicharancha","title":"ऐवज विचारांचा | Aiwaj Vicharancha","description":"\u003cp\u003eAiwaj Vicharancha | ऐवज विचारांचा प्रा. स. ह.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eदेशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह ‘ऐवज – विचारांचा प्रकाशित होत आहे. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले व महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर स्वत:चा एक विशिष्ट ठसा उमटवला. ‘राष्ट्रवाद या विषयाचे त्यांचे लिखाण हे अनेक मान्यवरांकडून व व्यासपीठांवरून चर्चिले गेले. प्रस्तुत पुस्तकात स.हं.च्या लेखांची विभागणी ‘राष्ट्रवाद, ‘सामाजिक आणि आर्थिक, ‘व्यक्तिचित्रे आणि ‘संकीर्ण या चार प्रकारांत केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया सर्व लेखांतून श्री. देशपांडे यांची स्वतंत्र लेखन-शैली, विचारांतील सखोलता व सूक्ष्मता, तसेच तर्कशुद्ध व चिरेबंद मांडणी या बाबी वाचकाला सातत्याने जाणवत राहतील. आजही ताजे वाटणारे त्यांचे विचारगर्भ लेखन पुढील पिढ्यांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311243859,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_2235627d-a100-4439-b659-8468f21cf300.webp?v=1758614777"},{"product_id":"navrasancha-jadugar-mohammad-rafi","title":"नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी | Navrasancha Jadugar Mohammad Rafi","description":"\u003cp\u003eमोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eरसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार ! संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण... क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधाही आहे... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311276627,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_3dae96a1-7be1-42f0-b83d-68e034f0159d.webp?v=1758614779"},{"product_id":"aawajacha-awaliya-kishor-kumar","title":"आवाजाचा अवलिया - किशोर कुमार | Aawajacha Awaliya - Kishor Kumar","description":"\u003cp\u003eहिंदी चित्रपटसृष्टीतलं उत्स्फूर्त संगीताचा आविष्कार असणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कुमार. एक मनस्वी हळवा माणूस लपला होता त्याच्यात. ‘आ चल के तुझे मैं ले के चलूं’ गाण्याचा गीतकार किशोर ‘कोई हमदम न रहा’ गाण्याचा संगीतकार होता. ‘मैं हुं झुम झुम झुमरू’ गाणारा किशोर ‘दुखी मन मेरे’सारखी दर्दभरी गाणी तितक्याच तन्मयतेनं गायचा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया पुस्तकात रसिक कला आस्वादक सुहास किर्लोस्कर आपल्याला सांगताहेत किशोर कुमार नावाच्या अष्टपैलू गायकाबद्दल. कसा होता किशोर गायक म्हणून? काय होत्या त्याच्या खासियती? सिनेसृष्टीत त्याला कसं झगडावं लागलं?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया रसदार कथनानंतर वाचायला मिळतील किशोरची निवडक पंचवीस गीतं आणि त्यांचं रसग्रहण... ते वाचून तुम्हाला मूड येईलच, तेव्हा प्रत्येक गीतानंतर दिलाय त्याचा क्यूआर कोड. तो स्कॅन करा नि गाणं ऐकण्याचा आस्वादही घ्या.. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311309395,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_c2d8b046-e1ce-4ca8-8235-b419fdb1c5b8.webp?v=1758614781"},{"product_id":"shah-ani-katahah","title":"शह आणि काटशह | Shah Ani Katahah","description":"\u003cp\u003eरुग्णावर उपचार करताना आलेल्या निरनिराळ्या अनुभवांतून मिळाला एक अमिट धडा : डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यात विसंवाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरते वैद्यकीय व्यवसायातील चुरस ! १९८७ साली घडलेली एक सत्यकथा !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eवैद्यकीय प्रवेशांमधे होणार्‍या गोंधळांची ! त्याविरुद्ध आवाज उठवणार्‍या लढ्याची !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रशासन, विद्यार्थी-पालक अन् वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि न्याययंत्रणेवर टाकलेल्या डावपेचांची ! या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तज्ज्ञाने घेतलेला वृत्तांतवेध : हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311342163,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_c5829706-d8d8-4bc9-abfa-9f50e725caed.webp?v=1758614784"},{"product_id":"dattaprasad-dabholkaranchya-kavita","title":"दत्तप्रसाद दाभोळकरांच्या कविता | Dattaprasad Dabholkaranchya Kavita","description":"\u003cp\u003eउंटाचे सौंदर्य समजायला वाळवंटाचे डोळे लागतात... वाळवंटावर प्रेम करायला उंटाचा जन्म लाभावा लागतो... स्तालिन माझ्या स्वप्नात आला तो माझ्या स्वप्नात आलाय की मी त्याच्या स्वप्नात गेलोय, यावर मी चर्चा सुरू केली तेव्हा मिशीमध्ये अडकलेला चहा फुर्र फुर्र करत उडवत चक्क हसला आणि म्हणाला पेरेस्त्रोइका...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eपेरेस्त्रोइका... अनोळख्या देशातून आलेले अनोळखी पक्षी अगदी बिनधास्त न चुकता का येतात असे ? कोठून येतात ?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eकोठे जातात ? कोणता निरोप ते ठेवतात बरोबर आणि कोणती गाणी ? दत्तप्रसाद दाभोळकरांच्या कवितांमधील काही ओळी... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311374931,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_2dff929e-dc7d-486f-ab8f-0c43ded041e1.webp?v=1758614785"},{"product_id":"pyaass","title":"प्यासा | Pyaass","description":"\u003cp\u003eसुधीर नांदगावकर यांचे हे पुस्तक म्हणजे गुरुदत्तवरील त्यांच्या प्रेमाचा एक उत्कट आविष्कार ! गुरुदत्तच्या मृत्यूनंतर लगेचच त्याच्या घरी पोहोचलेल्या मोजक्या पत्रकारांत नांदगावकरही होते. त्यावेळी झालेल्या चर्चा, पत्रकार म्हणून कळलेल्या काही आतल्या गोष्टी आणि गुरुदत्तविषयीचा अपार आदर यांमुळे ‘गुरुदत्तने आत्महत्या केली’ यावर नांदगावकरांचा विश्वास कधीच बसला नव्हता...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसुधीर नांदगावकर यांनी या पुस्तकाच्या लेखनासाठी विशेष प्रयत्नांनी माहिती गोळा केली आहे. ‘चरित्र-कादंबरी-जीवनप्रवास’ असा एक संमिश्र घाट स्वीकारला आहे. गुरुदत्तच्या आयुष्यातल्या एरवी फार लिहिल्या-बोलल्या न गेलेल्या घटनांचे तपशील, त्याच्या जगण्याचे, चित्रपटनिर्मितीचे, विचारप्रकियेचे काही नवे पैलू आपल्याला कळतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआपल्या ओळखीचे चित्रपट, गाणी यांचा जन्म कसा झाला, या माहितीत आपण गुंतत जातो आणि अनेकदा तर त्या घटनांचे आपण जणू प्रत्यक्ष साक्षीदार आहोत, असे आपल्याला वाटत राहते... श्रीकांत बोजेवार हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311407699,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_1fc0cac2-e376-4eea-9283-4db44009bc73.webp?v=1758614787"},{"product_id":"vastragatha","title":"वस्त्रगाथा | Vastragatha","description":"\u003cp\u003eVastragatha | वस्त्रगाथा अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. कुतूहल ही नैसर्गिक प्रेरणा आणि बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी यांच्या बळावर माणसाने अनेक गोष्टींमागच्या शास्त्राचा शोध घेतला अन् कलात्मक सौंदर्याविष्कार घडवले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eकापसासारख्या वनस्पतिज अन् रेशमासारख्या प्राणिज पदार्थांच्या तंतूंच्या धाग्यांपासून मागावर वस्त्र विणणे; त्याला सोन्यासारख्या धातूच्या तारेची जरतारी जोड देणे या साऱ्यांतून साकारलेला वस्त्राविष्कार म्हणजे शास्त्र-कलेचा अनोखा संगम ! कित्येक शतकांची परंपरा, अनेक ज्ञात-अज्ञात विणकरांची प्रतिभा आणि निरीक्षण-अभ्यास-प्रयोगातून जन्मलेली नानाविध तंत्रे यांतून जगभरात विविध रूपांमध्ये वस्त्रनिर्मिती अन् वस्त्रसंस्कृतीचा विकास झाला. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागात अशीच एक देखणी वस्त्रसंस्कृती आकाराला आली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eजनजीवनाशी अतूटपणे एकरूप झालेल्या या वस्त्रधाग्यांच्या मोहक प्रतिमा साहित्याच्या कथाकाव्यातून, चित्र-शिल्पांच्या रंगरेषांमधूनही उमटल्या. एका हुन्नरी कलाकाराने, व्यासंगी अभ्यासकाने आणि जाणकार तज्ज्ञाने विविधांगांनी घेतलेला या वस्त्रसंस्कृतीचा वेध. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311440467,"sku":null,"price":810.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_4e5fce17-ecdd-4de6-81d0-940ac2bf6cbe.webp?v=1758614789"},{"product_id":"nandighosh-yatra","title":"नंदीघोष-यात्रा : श्रीकृष्णकथा : वेध नवा | Nandighosh-Yatra","description":"\u003cp\u003eNandighosh-Yatra | नंदीघोष-यात्रा : श्रीकृष्णकथा : वेध नवा डॉ. रघुनाथ माशेलकर (FRS) जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत पुस्तक वाचताना आपण सहप्रवासी कधी होतो ते समजतच नाही, ही त्यातली खरी गंमत आहे. त्या दोन मित्रांच्या गप्पांत आपण रंगून जातो, जणू तो काळ जगू लागतो, त्यायोगे आपल्या ज्ञानात तर भर पडतेच, पण आपण नकळत सुज्ञतेचे धडेही आत्मसात करतो.... कृष्णाच्या दैवी रूपापल्याड नेणारी ही शिकवण आहे... प्रत्येकाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे, हे मी आवर्जून सांगेन.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eडॉ. सुचेता परांजपे संस्कृत, ‘वेदिक स्टडीज आणि ‘इंडॉलॉजी; मध्ये जगभर मान्यताप्राप्त विदुषी; अमेरिकन, जर्मन विद्यापीठात प्राध्यापिका (BORI) महाभारत चिकित्सक आवृत्ती;च्या समितीवर; फग्र्युसन कॉलेज फेलो दोन निरनिराळ्या व्यक्तींनी एकत्र येऊन प्राचीन इतिहासाला आजच्या संदर्भात आणून एक अतिशय वाचनीय आणि उत्सुकता वाढवणारं वाङ्मय लिहायचं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. खूप अवघड मार्ग आहे हा. कुठेही, अगदी काळाबद्दलही चूक नाही; सगळं कसं एकसंध. आपल्या प्राचीन परंपरा आणि वाङ्मय यांना कारण नसताना धुत्कारणा-या नवीन पिढीचे डोळे उघडणारं हे मनोरंजक पुस्तक सर्वांनीच वाचावं असं आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eडॉ. मोहन आगाशे मानसोपचारतज्ञ, कलाकार, संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते अगदी सामान्य परिस्थितीमधील गंमत शोधण्याची हातोटी लेखकांपाशी आहे आणि ही विनोदबुद्धी मला आनंददायी वाटली... पुस्तकाची भाषा सहज आहे. अनेक बोधकथा आणि दंतकथा सांगताना वापरलेली दोन पात्रांमधील संवादात्मक शैली मनोवेधक असल्यामुळे पुस्तक हातांतून सोडवत नाही... अनुभवानुसार हे पुस्तक वाचून झाल्यावरसुद्धा दीर्घकाळ माझ्या स्मरणात राहील. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311473235,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_78290227-b706-4091-b6cd-404501ea8bd8.webp?v=1758614792"},{"product_id":"hindutava-marxvaad-ani-bharat","title":"हिंदुत्व, मार्क्सवाद आणि भारत | Hindutava, Marxvaad ani Bharat","description":"\u003cp\u003eHindutava, Marxvaad ani Bharat | हिंदुत्व, मार्क्सवाद आणि भारत कोणतेही अस्तित्व निखळ चांगले किंवा निखळ वाईट नसते. प्रत्येक अस्तित्वाचा काही उद्देश असतो. शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या हिंदुत्व परिवार आणि मार्क्सवादी परिवारावरसुद्धा चांगल्या–वाईटाचे शिक्के बसले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eस्वातंत्र्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यावर काँग्रेस परिवार देशाच्या राजकारणात वैचारिक कोलांट्याउड्या मारत राहिला. काळाच्या ओघात काही पक्ष नाहीसे झाले, तर काहींचे अस्तित्व मर्यादित राहीले. अनेक चांगल्या संघटना आणि संस्था डबघाईला आल्या किंवा त्यांचे महत्त्व कमी झाले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eपण हिंदुत्व परिवार आणि मार्क्सवादी परिवार यांनी त्यांची तत्त्वे आणि त्यांची कॅडर यांच्या बळावर ठाम उभे राहून, हातात सत्ता असताना व नसतानाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली. हे दोन परिवार आणि भारत यांच्या राजकीय वाटचालीचा हा मागोवा. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311506003,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_8d55032e-8750-47c5-be13-c5e26efa364e.webp?v=1758614796"},{"product_id":"mee-ek-kalandar","title":"मी एक कलंदर | Mee Ek Kalandar","description":"\u003cp\u003eMee Ek Kalandar | मी एक कलंदर प्रत्येकाचं जीवन हे नियती व त्या व्यक्तीचा स्वभाव यांच्या मिश्रणातून घडत असतं. कुणी कितीही ठरवलं तरी शेवटी नियती आणि अन्य काही गोष्टी कोणाच्या हातात नसतात. तुमचा स्वभाव आनुवंशिकता ठरवते आणि नियती तर अज्ञातच असते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eही अज्ञात नियती आपल्याकडे वळविण्यासाठी जीवनात जो संघर्ष, प्रयत्न करावे लागतात; त्यामुळेच जीवनात मजा येते. वयाच्या बाराव्या वर्षी शालेय जीवनाला सुरुवात करून, अनेक अडथळे अन विघ्नांवर मात करून मी वयाच्या सदतिसाव्या वर्षी डॉक्टर झालो आणि पुढे वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी पोस्ट ग्रज्युएशन केले. हा मधला प्रदीर्घ काळ चित्रविचित्र घटना, वेडीवाकडी वाटा-वळणं व अडथळ्यांच्या शर्यतीनं भरलेला होता...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eकलंदर वृत्तीनं जगलेल्या आपल्या आयुष्याची कहाणी सांगत आहेत डॉ. गंगाधर गोरे हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311538771,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_9167b3a7-7b5b-41fe-97b2-b0e88c3b84e1.webp?v=1758614796"},{"product_id":"chandrakant-kulkarni-saadar-karait-ahe","title":"चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे ...! | Chandrakant Kulkarni Saadar Karait Ahe ...!","description":"\u003cp\u003eChandrakant Kulkarni Saadar Karait Ahe ...! | चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे ...! कवीनं असावं अल्पाक्षरी, आणि नाटककारानं मितभाषी. अभिनेत्यानं करावा संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त. तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eध्वनी, प्रकाश, रंग, रेषा यांनी टाकावा अवकाश भारून. प्रेक्षकांनी सगळं अनुभवावं, मूक राहून आणि एकाग्र होऊन. समीक्षकांनी करावं नाट्यानुभवाचं विश्लेषण अचूक. पण मग,... दिग्दर्शकानं काय करावं?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआरंभापासून अंतापर्यंत, प्रत्येक क्षण उजळून टाकण्याचं कसब शिकवावं. मंचावरील आणि मंचामागील प्रत्येकाचा मित्र, तत्त्वज्ञ आणि दिशादर्शक व्हावं. हे का आणि कसं करावं? सांगत आहेत, मराठी नाट्यसृष्टीतील अग्रणी दिग्दर्शक आणि अभिनेते- चंद्रकांत कुलकर्णी. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311571539,"sku":null,"price":720.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_f0328481-96bd-4fe3-9789-6f5804cae11c.webp?v=1758614799"},{"product_id":"maze-shaletale-prayog","title":"माझे शाळेतले प्रयोग | Maze Shaletale Prayog","description":"\u003cp\u003eMaze Shaletale Prayog | माझे शाळेतले प्रयोग गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर या छोट्याशा गावातील ‘विद्या मंदिर’ ही प्रयोगांची पहिली पायरी. मुलांमध्ये दडलेल्या उपजत क्षमतांचा विकास घडवणे हे या सा-या प्रयोगांचे लक्ष्य.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eवर्गात प्रत्यक्ष घडलेली अध्ययन-अध्यापन प्रकिया हा या प्रयोगविषयाचा गाभा. शिकणे आनंददायी व्हावे, शिक्षणातील साचलेपण जाऊन ते निर्झरासारखे प्रवाही व्हावे, या उद्दिष्टाने झपाटलेल्या एका शिक्षणतज्ज्ञाने रेखाटलेला हा अनोखा प्रवास.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eविद्यार्थी, पालक, सहयोगी शिक्षक आणि या क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुंतलेल्या अनेक व्यक्ती यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून साकारलेले - प्राथमिक शाळेतील शिक्षिका ते शिक्षणप्रशासनात सहभागी झालेल्या शिक्षणाधिकारी अशा विविध भूमिकांमधून भरीव योगदान देणा-या हाडाच्या शिक्षणतज्ज्ञाने शब्दबद्ध केलेले - माझे शाळेतले प्रयोग हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311604307,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_5d402a8e-6678-46d1-a002-090a67d4227c.webp?v=1758614800"},{"product_id":"abhishekee-pandit-jitendra-abhisheki","title":"अभिषेकी -पंडित जितेंद्र अभिषेकी | Abhishekee :Pandit Jitendra Abhisheki","description":"\u003cp\u003eAbhishekee :Pandit Jitendra Abhisheki | अभिषेकी -पंडित जितेंद्र अभिषेकी पं. जितेंद्र अभिषेकी. शिष्य, मैफलगायक, संगीतकार आणि गुरू ही त्यांची संगीतविश्वातील चार रूपं. स्वत:च स्वत:च्या तत्त्वांशी, ध्येयांशी, उद्दिष्टांशी स्पर्धा करत पराकोटीच्या तन्मयतेनं एकाच वेळी साकारलेल्या या चार भूमिका! त्यात आपण अव्वलच असलं पाहिजे, ही त्यांची आंतरिक उर्मी! त्यामुळे असेल, आपल्या प्रत्येक भूमिकेत वेगळं काही करण्याचा अट्टाहास त्यांनी केला नाही; पण आपोआप खूप काही वेगळं घडत गेलं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्याविषयी संगीतवर्तुळात कौतुक होतं, कुतूहल होतं. पं. जसराजजी म्हणत असत, `उस शिष्य का क्या कहना कि जिनके गाने पे उनके गुरुही हजार जान से फिदा हों। तर पं. भीमसेन जोशींचा अनुभव होता, `पं. जितेंद्र अभिषेकी हे रसिकांची मागणी असलेले कलाकार आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यांच्याविषयी रसिकांच्या मनात एक वेगळं आकर्षण आहे. ज्येष्ठ गायक-संगीतकार सुधीर फडके यांना बुवांच्या चालींमध्ये त्यांचं प्रतिभासंपन्न समृद्ध व्यक्तिमत्त्व दिसत असे, `मीच काय, अनेक कीर्तिवंत संगीतकारांनी अभ्यास करावा, अशा त्यांच्या नाट्यसंगीतरचना आहेत. ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री ज्योत्स्नाबाई भोळे यांनी आपल्या गोव्याच्या गंपूची जडणघडण, त्याचा उत्कर्ष जवळून पाहिला होता. बुवांना गंपू म्हण-यांपैकी ज्योत्स्नाबाई एक होत्या. `खूप मोठी शिष्यपरंपरा एका विशिष्ट पद्धतीनं निर्माण करण्याचं फार मोठं श्रेय जितेंद्रला आहे. अशा या प्रतिभावान, चतुरस्र कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचा अन् संगीतकर्तृत्वाचा वेध घेणारा चरित्रग्रंथ. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311637075,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_6e99537d-f3ee-4c25-8d8a-07472c540e49.webp?v=1758614802"},{"product_id":"gyaneshwari","title":"ज्ञानेश्वरी - स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य | Gyaneshwari","description":"\u003cp\u003eGyaneshwari | ज्ञानेश्वरी - स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य कोणत्याही ग्रंथाचे रहस्य समजून घ्यायचे असेल, तर त्या ग्रंथाविषयीचे आणि ग्रंथकारासंबंधीचेही सर्व पूर्वग्रह विसरूनच तो ग्रंथ वाचायला हवा. ग्रंथ आपल्याशी काही बोलू इच्छितो आणि आपण त्याला मोकळेपणाने बोलू दिले पाहिजे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eग्रंथ आपल्याशी बोलत असताना तो व आपण यांच्यामध्ये तिस-याला येऊ देता कामा नये. तसा कोणी आला; तर ग्रंथाशी आपला जो संवाद व्हायला हवा, त्यात विक्षेप येतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eज्ञानेश्वरीच्या वाचनाच्या वेळी जे पूर्वग्रह माझ्या वाचनात विक्षेप आणीत होते, ते बाजूला सारल्यावर माझे वाचन अधिक फलदायी ठरले. हे पूर्वग्रह ज्ञानेश्वरीचे स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य यांविषयीचे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311669843,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_916462d9-2b7e-4c0a-b8f2-0c8fce922218.webp?v=1758614804"},{"product_id":"punashcha-honeymoon","title":"पुनश्च हनिमून | Punashcha Honeymoon","description":"\u003cp\u003ePunashcha Honeymoon | पुनश्च हनिमून पुनश्च हनिमून एका लांबलेल्या आत्महत्येचा प्रवास. आजच्या जागतिकीकरणाच्या काळातील मध्यमवर्गीय, चाळिशीतील जोडप्याच्या वैवाहिक जीवनातील वैचारिक विसंवादाची जीवघेणी आंदोलने या दोन तासांच्या नाट्यप्रयोगात आहेत. ही आंदोलने आषाढातील भरलेले आकाश अधिक झाकोळून टाकतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eहे काही अवखळ करमणुकीचे नाटक नाही. सध्याच्या जगण्यातील विखंडतेवर हे नाटक सतत भाष्य करते. जगण्यातील अपरिहार्यता, स्त्री-पुरुष लग्नसंबंधांची सार्थकता, अर्थपूर्णता आणि कालौघातील निरर्थकता, त्यातील भाव-विषता यांच्या रंगमंचीय खेळाचे गारूड नाटक संपल्यावरही आपल्याबरोबर येते. वरकरणी मस्त चाललेल्या लग्नसंसाराच्या अंतर्मनाचे हे रंगमंचीय धिंडवडे आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअशा नाटकाला सुरुवात असते, पण शेवट असतोच असे नाही. तो प्रत्येकानी आपापला समजून घ्यायचा असतो. सतीश आळेकर हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311735379,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_aae2c913-a44e-448b-aa5d-d6d0e19757e7.webp?v=1758614806"},{"product_id":"nave-shaikshanik-dhoran-vidyarthi-palakansathi-margadarshan","title":"नवे शैक्षणिक धोरण-विद्यार्थी -पालकांसाठी मार्गदर्शन | Nave Shaikshanik Dhoran-Vidyarthi-palakansathi margadarshan","description":"\u003cp\u003eNave Shaikshanik Dhoran-Vidyarthi-palakansathi margadarshan | नवे शैक्षणिक धोरण-विद्यार्थी -पालकांसाठी मार्गदर्शन ५५ प्रश्नांची नेमकी उत्तरं, आणि आणखीही पुष्कळ... सरकारी धोरणं वेळोवेळी जाहीर होत असतातच की. मग नव्या शैक्षणिक धोरणाचा यंदाच एवढा गवगवा कशासाठी? ही फक्त सरकारी प्रसिद्धीची युक्ती? की त्यात खरंच आहे काही उपयुक्त? कुणाचा काय फायदा होणार यातून?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eशिक्षकांना काही लाभ मिळणार की कामंच वाढणार फक्त? आमच्या मुलांचं खरंच काही कल्याण होणारे का? भाषांची संख्या वाढवणार का? पदवी परीक्षा तीनऐवजी चार वर्षांची? कशासाठी? क्रेडिट पॉलिसी फार किचकट नाही का वाटत?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e‘मेजर, मायनर, कौशल्ये, व्होकेशनल अशा वेगवेगळ्या श्रेणीत विषय विभागले आहेत ते का? १० ± २ ± ३ ऐवजी ५ ± ३ ± ३ ± ४ हा नवा पॅटर्न आणलाय. यातून गोंधळ वाढणार की काही पदरात पडणार? पालकांनी नक्की करायचं तरी काय? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२०) यंदापासून अमलात येतंय, अशा वेळी शिक्षणातल्या सगळ्या घटकांना पडणा-या तब्बल ५५ प्रश्नांची नेमकी उत्तरं देणारं, शिक्षणतज्ज्ञांनी लिहिलेलं मोलाचं पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311768147,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_6e3e0003-6ba1-45e2-a871-1666e9fd7fda.webp?v=1758614809"},{"product_id":"nagarikatva-durustee-kayada","title":"नागरिकत्व दुरुस्ती कायदा | Nagarikatva Durustee Kayada","description":"\u003cp\u003e‘(फाळणीनंतर) पाकिस्तानातील हिंदूंची स्थिती नाझी जर्मनीतील ज्यूंसारखी होईल. ‘(भारत आणि पाकिस्तान या) दोन्ही देशांनी हे मान्य करावे की, आपल्या देशातील धार्मिक व सांस्कृतिक अल्पसंख्याकांना दुस-या देशात स्थलांतरित होण्याची इच्छा व्यक्त करण्याचा हक्क राहील... अशा स्थलांतराच्या विरुद्ध असणारे सर्व कायदे व नियम रद्द व शून्यवत होतील...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e‘ही योजना नेमकेपणाने व्याख्या केलेल्या अशा काही अल्पसंख्याकांपुरतीच मर्यादित केली पाहिजे की, जे धार्मिक किंवा सांस्कृतिक भिन्नत्वाच्या कारणांमुळे निश्चितपणे भेदभावाचे किंवा पक्षपाताचे बळी ठरणारे आहेत... ‘पहिली पाच वर्षे ही योजना आयोगामार्फत सरकारी मदतीने व खर्चाने होईल... ह्या कालमर्यादेनंतर स्थलांतर करायचे असेल, तर त्यांना सरकारी मदतीशिवाय व स्वत:च्या खर्चाने कधीही स्थलांतर करण्याचे स्वातंत्र्य राहील.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या सहा शेजारी देशांमधील ठरावीक व्यक्तींना भारताचे नागरिकत्व ज्या कायद्याने मिळू शकते, त्या नव्या कायद्याच्या विविध पैलूंचा वेध घेणारे - हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311800915,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_872ba56e-7de4-42fa-bc06-0a734a0414b2.webp?v=1758614811"},{"product_id":"tagi-gang-ani-itar-prayogksham-natika","title":"टगी गँग आणि इतर प्रयोगक्षम नाटिका | Tagi Gang Ani Itar Prayogksham Natika","description":"\u003cp\u003eमुलं आणि पालक या दोघांनाही डोळ्यांसमोर ठेवून केलेलं हे खुसखुशीत लेखन आहे. एकांकिका, शॉर्ट फिल्म किंवा स्किटच्या स्वरूपात या नाटिका सादर होऊ शकतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमुलांचे विषय हाताळणारं हे लेखन केवळ मनोरंजक नाही, काही नाटिका बोध घेण्याजोग्याही आहेत. मुख्य म्हणजे रंगमंच, अभिनय, कॅमेरा, लघुपट, प्रहसन अशा अनेक गोष्टींची माहिती आणि अनुभव मुलांना यांतून मिळू शकतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या सहा नाटिकांचं संकलन - हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311833683,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_e94bdc4f-5fc0-4995-9e33-af3333081805.webp?v=1758614813"},{"product_id":"aabali","title":"आबली | AAbali","description":"\u003cp\u003eमुलांमध्ये वाचनाची गोडी वाढावी, म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक अभिनव उपक्रम राबविणाऱ्या एका शिक्षकाने लिहिलेल्या या कथा ! ग्रामीण मुलांचं भावविश्व उलगडताना त्यांची स्वप्नं, जिद्द आणि आकांक्षा यांचं उत्कट दर्शन या पुस्तकात घडतं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eस्थानिक बोली अन् ग्रामीण मातीचा गंध असलेल्या या कथा ग्रामीण आयुष्याचे अनेक पदर ठळकपणे वाचकांसमोर आणणाऱ्या आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311866451,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_f349fab6-e5f8-4d06-a03a-9e1f8434bdb5.webp?v=1758614815"},{"product_id":"yuddhanantar","title":"युध्दानंतर ... | Yuddhanantar...","description":"\u003cp\u003eआदित्य दवणे यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह. युद्ध ही एक थीम, एक विषय घेऊन ते लिहितात. खरंतर आजचा सगळा काळच अस्वस्थतेचा काळ आहे, तरी या कवीला इच्छा आहे युद्धभूमीचं नंदनवन करण्याची, इतिहासातून बोध घेत नवी पिढी घडवण्याची. माणसामाणसात पेटलेल्या आणि पेटवल्या जाणार्‍या युद्धानं तो अस्वस्थ होतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसंवेदनशील आणि सर्जनशील मनांवर आलेलं दडपण त्याला जाणवत राहतं. त्याला आजच्या परिस्थितीतील दाहकता कळलेली आहे. कधी विरोधाभास दाखवून, तर कधी उपरोधाचा सूर लावून तो कळकळीनं सांगत राहतो माणसाच्या मनात पेटलेल्या युद्धांबद्दल, युद्धानं दिलेल्या एकटेपणाबद्दल, तुटलेपणाबद्दल, माणसांतल्या जनावरांबद्दल, माणसाच्या असहाय्यतेबद्दल, त्याच्यातल्या माणूसपणाबद्दल. या कवीची श्रद्धा आहे आपल्या शब्दांवर आणि त्यातल्या अर्थांवर.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eते अर्थ तो नेमकेपणाने आपल्यापर्यंत पोचवतो. माणसात लपलेल्या हिंस्रतेचे अनेकविध पदर उलगडून दाखवणारा हा कवी त्याच्यातल्या माणूसपणाचेही अनेकदा दर्शन घडवतो. नीरजा हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311899219,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_2b358ab3-f555-4cbc-a483-dc78986a3a99.webp?v=1758614817"},{"product_id":"tv-malika-ani-barach-kahi","title":"टीव्ही मालिका आणि बरंच काही....! | TV Malika Ani Barach Kahi","description":"\u003cp\u003eटीव्हीविषयी माझ्या मनात प्रचंड कृतज्ञता आहे. ह्या क्षेत्रानं असंख्य कलावंत मित्रमैत्रिणींना सन्मान आणि सुबत्ता मिळवून दिलीय. अहोरात्र चालणारी ही करमणुकीची यंत्रणा मुग्धा या पुस्तकातून आपल्याला समजावून सांगते. ती आरोपीचा वकील अजिबात होत नाही. ह्या क्षेत्राला कमी लेखणा-यांना ती दूषणं देत नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रत्येक लेखातून उलगडत जाते मालिका-खिंड लढवणा-या कित्येकांच्या मेहनतीची गोष्ट. मुग्धाच्या पुस्तकाची सफर अत्यावश्यक आहे. कारण ९०% घरांमध्ये टीव्ही आहे. कॉलेजमध्ये असताना एकांकिका विश्वात कुतुहलानं वावरत असल्यापासून मी मुग्धाला ओळखते. तिचं मोहक व्यक्तिमत्त्व बघता ती अभिनयक्षेत्रात रमणार, ही अटकळ मनाशी बांधणं सोपं होतं. पण पुढे मुंबईत स्थिरावताना तिनं मालिकांचं लेखन सुरू केलं आणि आज ती त्यातही यशस्वी आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमुग्धा तिच्या प्रवासात सजगपणे चालत राहिली. स्वत:च्या प्रवासाकडे ती प्रांजळपणे पाहू शकतेय. आता त्यातले बारकावे ती आपल्यासाठी खुले करतेय. अभ्यासू तरी रंजक अशी ही शोधकथा मनोरंजनासाठी आसुसलेल्या असंख्य प्रेक्षकांसाठी मोलाची ठरणार आहे. सोनाली कुलकर्णी हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311964755,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_565666e7-f6f6-414c-9e52-c04aa4069f3c.webp?v=1758614819"},{"product_id":"made-in-china","title":"मेड इन चायना | Made In China","description":"\u003cp\u003eMade In China | मेड इन चायना आपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eवास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन - अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्षात प्रारूप आहे ‘नियंत्रित-भांडवलशाही’चं. चीन जितका आधुनिक, तितकाच ऐतिहासिकही. आधुनिकतेच्या महामार्गावर वेगाने पुढे जाताना एखाद्या वळणावर आपली प्राचीनता सोडून द्यावी, असं चीनच्या कोणत्याही सत्ताधीशाला वाटलेलं नाही, मग ते माओ असोत, डेंग असोत वा आजचे क्षी जिनपिंग.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eहे असे विसंवाद वागवत वागवत पुढे जाणं हे चीनच्या रक्तातच असावं. आजही भारताबरोबरचा संघर्ष असेल वा अमेरिकेशी स्पर्धा- चिनी सत्ताधीश आपली धोरणं ठरवताना इतिहासात दडलेल्या सूत्रांचा आधार घेत असतात. हे चकित करणारं विलक्षण चिनी प्रारूप समजावून देणारं- हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270311997523,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_7e116651-f5c4-4630-b644-8712106fd0df.webp?v=1758614821"}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/collections\/circle-image-will-text-all-books-display-book-images-of-different-languages.png?v=1762623802","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/collections\/all-products.oembed?page=523","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}