Skip to product information
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 199.00
Overview:
मराठी भाषेचे वर्तमान स्वरूपडॉ सुधीर रसाळ यांची वाङ्मयीन कारकीर्द ७० वर्षांची आहे. साधारणतः १९५५ पासून ते मराठी वाङ्मय विश्वाशी जोडले गेले आहेत. सत्तेमुळे परकी झालेली मातृभाषा, स्वातंत्र्यानंतरची आपली आणि शिक्षणाची भाषा; तसंच कुटुंबात बोलली जाणारी पण शिक्षणाचं माध्यम नसणारी भाषा आणि आज अनेक अर्थांनी अस्तित्वासाठी झगडणारी भाषा हा मराठी भाषेचा प्रवास त्यांनी अनुभवला आहे, नोंदवला आहे. बहुतांश प्रसंगी त्यावर लिखाण आणि भाष्य केलेलं आहे. प्रस्तुत पुस्तक मराठी भाषा अपेक्षेनुसार ज्ञानभाषा न होता उलट जगण्याच्या पटलावरून नाहीशी होण्याच्या अवस्थेपर्यंत पोचण्याच्या घटकांची, परिस्थितीची कारणं शोधणाऱ्या, प्रसंगी नोंद घेणाऱ्या भाषणांचा आणि लेखांचा संपादित संग्रह आहे. ही भाषणे, लेख काळाच्या विविध टप्प्यांवर प्रस्तुत केलेले आहेत. त्यात बदलेली तशीच स्थिर राहिलेली निरीक्षणं आहेत, कारणं आहेत. अध्यापन-अध्ययनाबाबत मूलभूत मांडणी आहे, भाषा शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी व्यवहार्य उपायदेखील आहेत. मराठी भाषेचे वर्तमान जगण्याच्या पातळीवरून शैक्षणिक व्यवस्थेला मध्यभागी ठेवून साहित्यिक संस्थांच्या पातळीपर्यंत विचार करणारं प्रस्तुत पुस्तक एकमेव आहे असं म्हणता येईल.अनिरुद्ध प्रभू, संपादक

Pickup currently not available