Skip to product information
होरपळ | Horpal by Chhaya Mahajan avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 206.25 Regular price  Rs. 275.00
Overview:
सध्याच्या युगात लग्न आणि घटस्फोट या दोन्ही गोष्टी त्वरित होताना दिसताहेत. बदलत्या जीवनशैली आणि घटनांमध्ये मानवी भावनिकता, जबाबदारी आणि प्रेम यांचा अभावही जाणवतो. व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व असणाऱ्या या काळात याच व्यक्तिस्वातंत्र्यामुळे कुणी उगाच भरडले जातेय का, याकडेही थोडे लक्ष देण्याची गरज आहे, तसेच न्यायासाठी कायद्याचा बडगा उगारताना त्याचा दुरुपयोग होऊ नये, याकडेदेखील प्रत्येक व्यक्तीनेच लक्ष द्यायला हवे. कारण कधी-कधी न्यायासाठी असणाऱ्या कायद्याचा बरेचजण गैरफायदा घेतात आणि त्यात निरपराधी लोक नाहक बळी ठरतात. अशा वेळी जवळच्या नातेवाइकांना आणि आरोपी ठरलेल्यांना आत्यंतिक त्रासातून आणि मानसिक क्लेशातून जावे लागते. कायद्याचा कठोरपणा आणि लवचीकता याच्या पुनर्विचाराची आज गरज निर्माण झाली आहे. एकतर्फी न्याय करताना इतरांवर अन्याय होत नाही ना किंवा ते भरडले जात नाहीत ना, हे पाहणे आवश्यक ठरते. या सगळ्या प्रक्रियेत स्वार्थी लोकांचे फावते, या सत्याची जाणीव ही कादंबरी आपल्याला करून देते.
Book cover type

You May Also Like