Skip to product information
Manasik Prathamopchar
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00
Overview:
* मानसिक प्रथमोपचाराचे स्वतंत्र विज्ञान आहे आणि ती एक कलाही आहे. समुपदेशक डॉ. प्रतिभा यांनी या शास्त्र आणि कलाकौशल्याची नेमकेपणाने मांडणी यामध्ये केली आहे. * मानसिक वेदना, दु:ख, चिंता, भीती यांसारख्या विकारांना आपल्या मनातून हुसकावून लावण्यासाठी गोल्डन मानसशास्त्रीय प्रथमोपचार पद्धती ही लेखिकेने स्वत: विकसित केली आहे. ही पद्धत व्यसनमुक्ती, गैरवर्तन, शारीरिक शोषण यांवरही उपयुक्त ठरू शकते, हे सांगितले आहे. *फिश! फिलॉसॉफी, बुद्धिबळाचा खेळ या अनोख्या, नावीन्यपूर्ण उपचारपद्धतीतून उत्तम जीवन कसे जगावे; याचे उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले आहे. * स्पर्शातील जादू, कॉफीपान, दीर्घ श्वसन, प्रार्थना यांबरोबर आठ सत्रांमध्ये एक-एक कृती (टास्क) देऊन साधकाला आपल्या मनाचे व्यवस्थापन कसे करावे, याचे साध्या-सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. * मराठी वाचकांसाठी मानसशास्त्रासारखा किचकट विषय या पुस्तकामधून समजून देण्यात आला आहे. त्यामुळे समुपदेशक, साधक, मानसशास्त्राचे अभ्यासक, विद्यार्थी, मानसिक त्रासाने ग्रस्त व्यक्ती व तिच्या कुटुंबातील सदस्य यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त मार्गदर्शक आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like