Skip to product information
ऑक्टोबर जंक्शन | October Junction by Divya Prakash Dubey avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 150.00 Regular price  Rs. 200.00
Overview:
सत्य आणि स्वप्न या दोन्हींदरम्यान असलेल्या लहानशा अवकाशात, 10 ऑक्टोबर 2010 रोजी चित्रा आणि सुदीप यांची भेट होते आणि पुढची 10 वर्षं ती दोघं दरवर्षी 10 ऑक्टोबरला भेटत राहतात. वर्षातून फक्त एकदा. ‘ऑक्टोबर जंक्शन’मधील दहा दिवस म्हणजे 10 ऑक्टोबर 2010 ते 10 ऑक्टोबर 2020 या दहा वर्षांची कथा आहे. या गोष्टीत एकीकडे आहे सुदीप, ज्यानं बारावीनंतर शिक्षण व घर, दोन्हीही सोडून दिलं आणि तो मिलेनिअर बनला; तर दुसरीकडे आहे चित्रा, जी तिनं लिहिलेल्या पुस्तकांच्या लोकप्रियतेमुळे आजकाल प्रत्येक लिटरेचर फेस्टिव्हलचा केंद्रबिंदू ठरतेय. तिची नुसती उपस्थिती मोठमोठी कॉलेजेस आणि पार्ट्यांची शान वाढवते. दर रविवारच्या वर्तमानपत्रात तिचा लेख प्रसिद्ध होतो आणि पुढचा लेख प्रसिद्ध होईपर्यंत त्या लेखाविषयी सोशल मीडियावर चर्चांचे फडही रंगतात. आपली दोन आयुष्यं असतात. एक, जे आपण दररोज जगतो ते आणि दुसरं, जे आपल्याला दररोज जगावंसं वाटतं ते. ‘ऑक्टोबर जंक्शन’ ही चित्रा आणि सुदीपच्या त्याच दुसर्‍या आयुष्याची कहाणी आहे.
Book cover type

You May Also Like