Skip to product information
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 600.00
Author:
डॉ. अरुणा ढेरे | Dr. Aruna Dhere
Pages:
-
Publisher:
Padmagandha Prakashan
Language:
Marathi
Overview:
स्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडातल्या निवडक कवयित्रींची कविता त्यांच्या कविताविषयक विचारांसह इथे समोर ठेवली आहे. या कवयित्रींसाठी कविता ही गंभीर आणि जबाबदारीची गोष्ट आहे. धूसराच्या बळावर अवकाशाचं आव्हान पेलून दाखवणारी, स्वतःला तपासत माणूसपणाचा वेध घेणारी, धीटपणे शरीराविषयी, शरीरसंबंधांंविषयी बोलणारी, स्त्रीच्या आदिम दुःखाशी आणि तिला सोसाव्या लागणार्या, जीवनाच्या अर्थशून्यतेचा प्रत्यय देणार्या एकाकीपणाशी नाळ जुळून असणारी, माणसाचा अस्सलपणा आणि व्यवस्थेतला रचितपणा यांच्यामधल्या संबंधांचा शोध घेत जाणारी, आजच्या माणसाचं जगणं शब्दांत पकडू पाहणारी, एकूणच मानवी जगण्यातल्या अगतिकतेच्या जाणिवेने अस्वस्थ होणारी आणि तरी सामान्य, बंधयुक्त जगण्यातही पाय रोवून उभी असणारी, सामाजिक जाणीव गाभ्यातच घेऊन कृतिशीलतेचा हात धरू पाहणारी - अशी विविधांगी कविता लिहिणार्या या कवयित्रींनी स्वतःच्या अनुभवविश्वाचा शोधही अत्यंत सूक्ष्म आणि सजग अशा संवेदनशीलतेने घेतला आहे. भारती विद्यापीठाने सिद्ध केलेला हा प्रकल्प जाणकार रसिक आणि अभ्यासक यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

Pickup currently not available