Skip to product information
Sale price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
Overview:
लेखिका कांचन प्रकाश संगीत म्हणतात, दुःख न सांगता येते. सुखही मानावे लागते पण सुखाचे असे क्षण आणि कण आपल्या वाट्याला येतात तेव्हा त्यांना अलगद टिपावेत. 'सुरभिगंधा'मधून वाचकांना हा एक सकारात्मक संदेशच आहे. बाभळीचा काटा टोचला म्हणून बाभळ वाईट कधीच नसते. हे केवढे सत्य त्या सहज बोलून जातात.प्रत्येक कथा वाचताना वाचकांच्या ज्ञानात भर तर पडतेच पण सर्वात महत्वाचे म्हणजे आपली वृक्षाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते.अनेक वेळा लेखिके च्या मनाची अथांगता, स्वानुभव, तिची जीवसृष्टी-बद्दलची संवेदनशीलता वाचकांना डोळे मिटून विचार करण्यास प्रवृत्त करते याचा अनुभव मी घेतला आहे. 'सुरभिगंधा'मधील प्रत्येक शब्द उत्कट ! भावनांना भिडणारा आहे आणि त्यासोबत त्याला जोड देणारी लेखिका कांचन प्रकाश संगीत यांची रसाळ शैली, शब्दसामर्थ्य पेलणारी भाषा मध्येच काव्याची पेरणी त्यामुळे हे पुस्तक वाचल्याचे मला पूर्ण समाधान मिळाले. त्यांच्या भाषेचे सौंदर्य आणि लेखणीला लाभलेला निसर्ग सहवास, त्यामधील सहजता आणि सोबत सुगंधाची पेरणी त्यामुळे त्यांचे लेखन श्रीमंत झाले आहे.डॉ. नागनाथ टेकाळे('सुरभिगंधा' या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून)

Pickup currently not available