Skip to product information
The Art Of Laziness | The Art Of Being Alone | द आर्ट ऑफ लेझिनेस | द आर्ट ऑफ बीइंग अलोन | by Renuka Gavrani avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 356.25 Regular price  Rs. 475.00
Overview:
आळशीपणावर मात करणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे. एकूण २० टक्क्यांहून अधिक प्रौढ आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चालढकल करण्याच्या वृत्तीमुळे यश मिळवण्यात किंवा उद्दिष्ट गाठण्यात अडथळे येतात. सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळेही आळशीपणा वाढत चालला आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने या समस्येतून बाहेर पडण्यासाठी अगदी साधे-सोपे उपाय सुचवले आहेत. तसंच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही उपयुक्त आणि सहज अमलात आणण्याजोग्या सूचनाही दिल्या आहेत. आळशीपणा दूर करून महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्या गोष्टी अशा : उत्पादकता वाढवण्यासाठी स्वतःला चांगल्या सवयी लावणं. चालढकल करण्याच्या वृत्तीवर विजय मिळवणं. ध्येयं निश्चित करून त्यांची पूर्ती करणं. आळशीपणा आणि वाईट सवयी बदलणं कठीण आहे. तुमच्यात हा अवघड; पण सकारात्मक बदल घडवून यशस्वी जीवनासाठी कार्यक्षम जीवनशैली विकसित करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही. स्वतःचे बनायला शिका.’ आपण अशा जगामध्ये राहतो, जिथे कोणीही व्यक्ती व कोणतीही गोष्ट आपल्यासोबत कायमची राहू शकत नाही. आपण अतिउत्पादनक्षम वातावरण निर्माण केले आहे, ज्यामध्ये तुमच्या मित्रांना कामाच्या अधिक चांगल्या संधींसाठी दुसऱ्या शहरात जावे लागू शकते किंवा तुम्हाला अभ्यासासाठी तुमच्या कुटुंबापासून दूर जावे लागू शकते. या सतत बदलत असलेल्या चित्रात तुम्ही एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे, एकटे असणे म्हणजे एकाकी असणे नव्हे. तुम्ही तुमच्यासोबत आहात एवढाच त्याचा अर्थ आहे ! ‘द आर्ट ऑफ बीइंग अलोन’ या पुस्तकातून तुम्ही तुमच्या एकटेपणाचे रूपांतर ‘एकांतात’ कसे करायचे ते शिकाल. तसेच, एकटे राहण्याच्या कलेत कसे पारंगत व्हायचे ते शिकाल आणि तुमचे ‘सध्याचे आयुष्य’ तुमच्या ‘स्वप्नातील आयुष्यामध्ये’ रूपांतरित कसे करायचे तेही शिकाल. • तुमचा एकटेपणा एकांतात कसा रूपांतरित करायचा ? • एकटेपणाचे मूळ कारणच नष्ट करून एकटेपणाचे भय कसे दूर करायचे ? स्वतःच्याच प्रेमात पडण्यासाठी स्वतःला कसे जाणून घ्यायचे व आपल्या अंतरंगात खोलवर दडलेला ‘स्व’ कसा ओळखायचा ? • एकांताची गोडी कशी लावून घ्यायची व तो प्रगतीचा काळ कसा बनवायचा ? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचावे असे पुस्तक – ‘द आर्ट ऑफ बीइंग अलोन.’ रेणुका गवरानी यांना त्यांचे अनुभव व निरीक्षणे यांविषयी लिहायला आवडते. रेणुकांचे पहिले पुस्तक आहे – ‘द वूण्डस् ऑफ माय वर्डस्.’ प्रस्तुत पुस्तकातून जीवन जगण्याविषयीचे धडे मिळतात.
Book cover type

You May Also Like