Skip to product information
Uttar Pradeshchi Khidki | उत्तर प्रदेशची खिडकी By Vimal Chandra Pandey, Chinmay Patankar | विमलचंद्र पाण्ड्ये | चिन्मय पाटणकर
Sale price  Rs. 220.00 Regular price  Rs. 275.00
Pages: 158
Language: Marathi
Overview:
हिंदी भाषेतले बहुचर्चित लेखक विमलचंद्र पाण्ड्ये आता मराठीत! विमल चंद्र पाण्ड्ये  हा लेखक आपल्याला पारावर बसून गोष्ट सांगण्याच्या थाटात सुरू होतो. आपण त्याच्या सांगण्याच्या शैलीने भारावून जातो, कारण असा किस्सानिष्णात प्रकार खूप लेखक वाचून देखील आपल्यापर्यंत पोहोचलेला नसतो. हिंदीत अशा किस्से सांगणाऱ्या लेखकांची कमतरता नाही. परंपरा फार जुनी आहे. तरी व्यंगात्मक लिहिणाऱ्या काशीनाथ सिंह यांच्यापासून ते मनोहर श्याम जोशींच्या कथा-कादंबऱ्यांहून अधिक टोकदार कथा आपण वाचतोय, याची खात्री व्हायला लागते. कारण बदलत्या काळाचे आणि त्यानुसार बदललेल्या जगण्यातले सारे कोन या माणसाने आपल्या कथालेखनासाठी वापरलेत.  या कथा लेखकाचा हात लिहिता असण्याच्या काळात मराठीत येणे मला महत्त्वाचे वाटते. कारण आपल्याकडे हिंदी सोपे या जाणिवेतून भरताड अनुवाद भरपूर झाले. चांगले आले, त्यात क्लासिक कहाण्या प्रेमचंदपासून उदय प्रकाश यांच्यापर्यंत खूपच उशिराने मराठी वाचकांना वाचायला मिळाल्या. चिन्मय पाटणकर आणि रोहन प्रकाशन यांनी विमलचंद्र यांच्या या कहाण्यांना हिंदीत गाजत असतानाच मराठीत आणण्याची वाट सुकर करून दिली. हिंदीतील आवडीच्या लेखकाच्या म्हणून मी चिन्मय पाटणकर यांच्या अनुवादाला वाचायला घेतले. त्या मराठीत येताना बिघडल्या अथवा बिथरल्या नाहीत, याचा आनंद झाला. काही कथा एक तपानंतर वाचतानाही पहिल्या (हिंदीतल्या) वाचनासारखे त्यात अडकून राहता आले.हिंदी कथा का वाचाव्यात? तर तिथले आजचे कित्येक लेखक आणि लेखिका आजच्या जगण्याच्या प्रश्नांशी भिडत कथाप्रकारात प्रचंड ताकदीचे प्रयोग करीत आहेत. विमलचंद्र यांच्या अशा भरपूर दीर्घ कथा ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध आहेत. त्या वाचा अथवा त्या कथा नव्या पिढीचा अनुवादक चिन्मय पाटणकर व 'आंतरभारती' या मुद्रेअंतर्गत हिंदी व बंगाली भाषांतील दर्जेदार पुस्तकं मराठीत आणणाऱ्या 'रोहन प्रकाशन'कडून प्रकाशित होण्याची वाट पाहा. कुठलीच कथा निराश करणार नाही, खात्री बाळगा.       - पंकज भोसले, प्रस्तावनेत

You May Also Like