Skip to product information
Sale price
Rs. 262.50
Regular price
Rs. 350.00
Author:
श्री. व्यं. केतकर | S. V. Ketkar
Pages:
-
Publisher:
Padmagandha Prakashan
Language:
Marathi
Overview:
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे. का नसावा ? त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला; त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला : त्यांनी वेलीसारख्या वेटोळे घालून बसलेल्या मराठी कादंबरीला घनदाट अरण्याचे रूप दिले. "मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी मोहित केले - आशावादी कादंबरीस जोडमथळा देणे हे केतकरांचे एक खास वैशिष्ट्य : त्यातून कादंबरीकार एकाच वेळी काव्यात्मता व वास्तवात यांचे संसूचन करतो : जसे, 'आशावादी अथवा एका प्रवाहपतिताचे चरित्र ' ही १९२७ ची कादंबरी. ह्या कादंबरीतील "प्रवाहपतित" आहे ब्रह्मगिरीस्वामी. ह्या स्वामीच्या रूपाने कादंबरी राजकारण, समाजकारण, धर्मकारण यांचा विशाल पट साकार करते. कुसुमावती देशपांडे यांच्यासारख्या चोखंदळ समीक्षिकेने या कादंबरीचा गौरव केला आहे , एवढे सांगितले म्हणजे पुरे ! - डॉ. द. भि. कुलकर्णी

Pickup currently not available