Skip to product information
Sale price
Rs. 318.75
Regular price
Rs. 425.00
Author:
Krishnarao Arjun Keluskar
Pages:
-
Publisher:
साकेत प्रकाशन | Saket Prakashan
Language:
Marathi
Overview:
शहाजी महाराज म्हणजे जाज्वल्य स्वाभिमान, पराक्रम आणि धोरणी नेतृत्वाचा एक अद्वितीय संगम होय. त्यांच्या कर्तृत्वाने मराठी मातीला आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. ज्या काळी पाशवी अत्याचारांविरुद्ध ‘ब्र’ काढायची हिंमत नव्हती त्या काळात त्यांनी तीन वेळेस स्वतंत्र राज्य निर्माण केले. ‘होय, आम्हीही राजे होऊ शकतो’, हा संदेश येथील माणसाला दिला. मराठी जनतेच्या मनात नवी उमेद निर्माण केली. या स्वतंत्र राज्याच्या संकल्पनेने मराठी मनगटात ‘बळ’ आणि मराठी मनात ‘मूळ’ निर्माण केले. त्यांच्या संघर्षातून चेतविलेला हा ‘आत्मसन्मान’ म्हणजे मराठी इतिहासाचे सुवर्णपान होय. शिवबांना घडवून पालकांच्या आदर्शातून संततीचे भविष्य घडते, हा आदर्श विचार त्यांनी घालून दिला. शहाजी महाराजांच्या जीवनाची ही कथा म्हणजे केवळ एका कुटुंबाची गाथा नव्हे, तर स्वराज्य निर्माण करणाऱ्या युगाची प्रेरणा आहे. शहाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या धुक्यात झाकोळला गेला होता. डॉ. संजय गायकवाड लिखित ‘स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराज’ हा ग्रंथ इतिहासाच्या विस्मृतीत गेलेल्या या महानायकाला प्रज्वलित करण्याचा एक निःस्पृह प्रयत्न आहे. बाबा भांड ज्येष्ठ साहित्यिक छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरूष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य! आज राष्ट्रउभारणीसाठी देशातल्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या व्यूहनीतीचा साकल्याने विचार अन् अंगीकार करणे क्रमप्राप्त आहे.

Pickup currently not available