Skip to product information
Swami Vivekanand | Ek Thor Tatvavetta Socrates by Rajiv Ranjan , Neeta Pandharipande avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 300.00
Overview:
” हिंदू धर्माला भारतात पुनर्जीवित करणारे आणि हिंदू धर्माचे थोरपण जगभर समजावून सांगणारे थोर विचारवंत आणि संत म्हणून विवेकानंदांचे कार्य सर्वांना माहीतच आहे. विश्वधर्म समेलनात त्यांनी विश्वबंधुत्वाची भूमिका मांडली. खरं तर स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकी किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती. त्यांना नवा भारत घडवायचा होता आणि केवळ त्यासाठी त्यांनी भारतभ्रमण केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि ‘स्व जागृत करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचे आंदोलन देशभर पेटले; कारण त्यासाठी अनुकूल मनोभमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती. गुरूदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ‘‘तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. सर्व विवेकानंद सकारात्मक आहेत, त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही,’’ स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती. सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. स्वामीजींसारखा संत आपल्या विचारांच्या माध्यमातून किती मोठे परिवर्तन घडवू शकतो हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चरित्र वाचायला हवेच. सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य असलेले प्रेरणादायी चरित्र: ‘स्वामी विवेकानंद’. ————————————————————————————————————————– सॉक्रेटिस… एक तत्त्ववेत्ता, नीतिमूल्यांना महत्त्व देणारा. संवादाला लोकशाहीचा आत्मा मानणारा, अन्यायास विरोध करणारा. नैतिक, अहिंसक आणि विवेकास चालना देणारा ज्ञानी माणूस. सॉक्रेटिसच्या योगदानाविषयी विचारवंत सिसोरो म्हणतो, ‘‘सॉक्रेटिसने तत्त्वज्ञान स्वर्गातून खाली आणले, नगरातून त्याची स्थापना केली. घरात त्यास प्रवेश दिला आणि मानवी जीवन, नीती, सदाचार, विवेक यांच्या परस्परसंबंधाची गरज प्रतिपादन केली.’’ सद्गुण, सद्विचार म्हणजे नेमके काय, नैतिकतेच्या पायावर जीवन समृद्ध करण्यासाठी नेमकं काय करता येईल, एक चांगला संस्कारित समाज निर्माण होण्यासाठी नेमकं काय करता येईल, त्यासाठी नेमक्या कुठल्या नैतिक मूल्यांची कास धरायला हवी, अशा मूलभूत प्रश्नांचा शोध घेण्याचा सॉक्रेटिसने यशस्वी प्रयत्न केला. सॉक्रेटिसच्या या सर्व गोष्टी माणसाचे जीवन संपन्न करण्यास आजदेखील मदत करू शकतात, हे लेखिकेने या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितले आहे. हे पुस्तक जीवनाच्या विषम, कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी, अत्यंत कुशलतेने संकटांना सामोरे जाण्यासाठी उपयोगाचे ठरेल यात शंका नाही धर्माची मीमांसा, सद्गुणांचे महत्त्व, शुद्ध आचरण, स्त्रियांचा सन्मान, सदाचार अशा अनेक घटकांनी युक्त असे सॉक्रेटिसचे तत्त्वज्ञान आजही अतिशय उपयुक्त ठरते. तसेच संतुष्टता म्हणजे सुख, आळसाचा कळस, आत्मज्ञानी, सर्वज्ञानी, अशा सॉक्रेटिसच्या बोधकथा आपल्याला चिंतन करायला लावतात. सॉक्रेटिसच्या विचारांनी प्रेरणा घेऊन आपण तशी वागणूक ठेवली, तर आपलेच नव्हे तर समाजाचे जीवनदेखील नंदनवन होऊ शकेल.”
Book cover type

You May Also Like