Skip to product information
Hat Pay Halwa Jara ani Itar Ekankika
Rs. 130.00
Overview:
इथं समस्या नाहीत, तर आनंद आणि मनोरंजनाबरोबरच शिकवणही आहे... लहानग्यांच्या खोडकरपणातून नकळत उमटतात मैत्री, प्रामाणिकपणा आणि सहकार्याचे सुंदर धडे! मुलं रंगमंचावर या कथा जगतात आणि प्रेक्षकही त्यांच्याबरोबर पुन्हा बालपण अनुभवतात. प्रत्येक एकांकिका म्हणजे आनंदाचा झरा, ज्यातून वाहते निरागसता आणि आठवणींचा गोडवा. या चार एकांकिकांमध्ये मिळेल हास्यानंदाचा निखळ, अनमोल खजिना! अहो म्हणूनच तर... हातपाय हलवा जरा! लेखिकेविषयी : संज्ञा संदीप कुलकर्णी एम.कॉम., सुगम संगीत विषारद, डिप्लोमा इन सुगम संगीत, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, कंटेंट रायटर. आकाशवाणी पुणे केंद्रात वनिता मंडळ या महिलांसाठींच्या कार्यक्रम विभागात सूत्रबद्ध निवेदन, तसेच कार्यक्रम, कथा लेखन, मुलाखतींचा अनुभव. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘१०१ उमा सदन’ तसंच इन्फिनिटी रेडियोच्या ‘कवडसा’, या तिन्ही कौटुंबिक श्रुतिका मालिकांचे लेखन आणि दिग्दर्शन. अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन. वि.वा. शिरवाडकरलिखित ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकाच्या अभिवाचनाचे अनेक प्रयोग. जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक लेखक, दिग्दर्शक, कलाकार म्हणून ‘जी. ए. कुलकर्णी - एक अनवट वाट’ हा रंगमंचीय अविष्कार. ‘सारे सुखाचे सोबती’, ‘हिकरी डिकरी डॉक’, ‘आनंदाचे डोही’, ‘संजीगुडा’ या आणि अशा अनेक पुरस्कारविजेत्या एकांकिकांचे लेखन आणि दिग्दर्शन. लहान मुलांसाठी वर्कशॉप्स, तसेच त्यांच्यासाठी नाटुकल्या, एकपात्री, नाट्यछटा, एकांकिका यांचे लेखन.. त्यातल्याच चार निवडक एकांकिका या पुस्तकाच्या रूपात भेटीला येत आहेत... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like