Skip to product information
Sale price
Rs. 500.00
Regular price
Rs. 600.00
Overview:
जून २०१९ मध्ये, माझी 'पॉडकास्ट' या भारतात मूळ धरू पाहणाऱ्या नवीन माध्यमाशी ओळख झाली लहान मुलाला नवीन खेळणं मिळालं, की ते कसं सर्व प्रकारे ते खेळणं explore करू पाहतं, तसंच काहीसं माझं झालं. या माध्यमात काय काय प्रयोग करता येतील, हा सततचा विचार माझा कब्जा घेऊ लागला. पहिला पॉडकास्ट केला 'बायोस्कोप'- मराठी मातीतल्या गोष्टींच अभिवाचन मी यात करू लागले. नंतर 'बदल पेरणारी माणसे' हा मुलाखतींच पॉडकास्ट लगेचच सुरू केला. पुढे मार्च २०२० मध्ये लॉकडाउन लागला. घरातली कामं, मुलीची ऑनलाइन शाळा आणि पॉडकास्टचे रेकॉर्डिंग्स, या मध्ये दिवस भराभर जात होते. सगळेच आपापल्या घरांमध्ये बंद. तेवढ्यात आठवलं, लॉकडाउन सुरू झाला, तेव्हा घरात बंदिवासात असताना ताणतणावांना कसं तोंड द्यायचं, यावर आनंदकाकानी आम्हाला एक खास मुलाखत दिली होती. बदल पेरणारी माणसे मध्ये तो खास एपिसोड आम्ही फीचर केला होता. लगेच आनंदकाकाला फोन लावला. त्याला माझा मनसुबा सांगितला. आमचं दोघांचं एकमत झालं-लोकांना जर त्यांचं मन आणि त्याचे कंगोरे साध्या भाषेत समजावून सांगितले, तर कदाचित लोकांना आपल्या मनाला समजावून घेता येईल. मनाशी मैत्री झाली की परिस्थितीशी मैत्री करणं जरा सोपं होऊ शकेल. आम्ही त्याच फोनमध्ये पॉडकास्टचं नावसुद्धा ठरवून टाकलं 'मनाचा पॉडकास्ट.' हा पॉडकास्ट सुरू केला, तेव्हा आनंदकाका म्हणाला होता- 'एखाद्याला जरी मदत झाली, तरी we are successful!' या व्याख्येने आम्ही super duper successful झालो, असं म्हणणं egoistic होईल कदाचित, पण ते चुकीचं ठरणार नाही...रीमा अमरापुरकर, मनोगतात

Pickup currently not available