Skip to product information
Patyara by Santosh Nago Shinde
Sale price  Rs. 322.50 Regular price  Rs. 430.00
Pages: 288
Language: Marathi
Overview:
टोकाची प्रतिकूलता आणि त्यात ‘काहीच करू शकत नाही', या भावनेतून येणारी हतबलता माणसाला बहुतांशवेळा निष्क्रिय बनवते. अशी माणसं मग त्यांच्या आयुष्यात जिवंत राहण्यापलीकडे फारसं काही करू शकत नाहीत. मात्र परिस्थितीशी जुळवून घेत प्रतिकूलतेवर मात करण्याचा प्रयत्न करणारी माणसं स्वत:ची नवी वाट निर्माण करत जगणं अर्थपूर्ण बनवतात. त्याचं प्रतिबिंब म्हणजे ‘पटयारा' हे आत्मकथन होय. वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त झालेला संसार सावरण्याच्या प्रयत्नात ढोर मेहनत करत आई मुलाला शाळेत घालण्यासाठी धडपडते. शिक्षणाची ओढ आणि वाचनाची गोडी लागलेला मुलगा आईची होणारी ओढाताण कमी करण्यासाठी परिस्थितीच्या रेट्यातून स्वत:लाही कामाला जुंपतो. पण कोणी काहीही म्हटलं, कितीही अपमान केला तरी शिक्षण आणि वाचनात खंड पडू न देण्यासाठी निगरगट्टपणा, कोडगेपणा यातून येणारं पटयारापण तो जपतो. त्याच पटयारापणातून रेखली जाते एक नवी वाट, जी संतोष शिंदे यांना धुळ्यासारख्या दुर्गम भागातून पुण्यापर्यंत घेऊन येते. इतकंच नाही, तर एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या उच्च पदावर बसवून जगभराचा प्रवास घडवते. त्याचीच ही प्रेरक गोष्ट... Patyara | Santosh Nago Shinde पटयारा | संतोष नागो शिंदे
Book cover type

You May Also Like