Skip to product information
Kayantar | कायांतर
Sale price  Rs. 540.00 Regular price  Rs. 600.00
Pages: 338
Language: Marathi

रश्मी पदवाड मदनकर लिखित 'कायांतर' वाचताना लक्षात येते की, ही केवळ कादंबरी नाही, तर ही एका तृतीयपंथी महिलेची जीवनकथा आहे. या पुस्तकाचा आकृतीबंध कादंबरीचा असेलही, पण ही केवळ कुणा एकाची रंजक गोष्ट नाही तर आपल्या समाजाच्या विचारसरणीचे विविध स्तर उलगडणारी कथा आहे. निसर्गाचे दान न पडलेल्या कुणाचीही कशी ससेहोलपट होते, घुसमट होते याचे विदारक दर्शन ही कादंबरी घडवते नागपूरच्या आंचल वर्मा हिच्या आयुष्यात खूप वेदना आहेत, पण तिची जिद्द त्याहूनही मोठी आहे. तिच्या प्रत्येक पावलामागे आत्मसन्मानासाठीची झुंज आहे आणि प्रत्येक स्वप्नामागे जगण्याची तिची न थकणारी इच्छा. या कथेत दुःख आहे, पण निराशा नाही. संघर्ष आहे, पण हार नाही. इथे आहे ती माणसाच्या आत दडलेली अमर्याद ताकद आणि स्वतःला ओळखण्याचे धैर्य म्हणूनच 'कायांतर' वाचताना तृतीयपंथीयांच्या आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो त्यांचे अस्तित्व, त्यांची स्वप्ने आणि त्यांचे माणूसपण जवळून जाणवते.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Kayantar | कायांतर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like