Skip to product information
A to Z Dairy Farming
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00
Pages: 190
Language: Marathi

जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना व मागणीला अनुसरून भारतातील दूध उत्पादकांना स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्व दूध उत्पादकांना नवनवीन व प्रात्यक्षिकांसह माहिती देणारे डॉ. पराग घोगळे आणि प्रशांत कुलकर्णी लिखित A. to Z डेअरी फार्मिंग हे पुस्तक! दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथमत: गायी-म्हशी विकत घेतल्यानंतर त्यापासून चांगल्या जातिवंत गायी-म्हशी आपल्या गोठ्यात तयार करण्यासाठी मुख्यत: ‘प्रजनन’, ‘जनावरांचा आहार’, ‘समग्र व्यवस्थापन’ आणि ‘दुधाचे गुणवत्ता नियंत्रण’ या चार गोष्टी महत्त्वाच्या असतात.

त्या समजून घेऊन पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करणे आवश्यक असते. थोडक्यात दूध व्यवसायाकडून दूध उद्योजकतेकडे जाण्याच्या प्रवासासाठी मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आहे. जगभरात गायी-म्हशींच्या सुमारे ८०० प्रजाती आहेत. गायी-म्हशी २० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात.

गायीला एक नाही तर चार पोटे असतात. त्यांच्या पोटात कोट्यवधी सूक्ष्मजीव असतात. अशा अनेक रंजक गोष्टींचा उलगडा यांमधून होतो. उपलब्ध तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन व आधुनिक व्यवस्थापन आत्मसात करण्यासाठी हे पुस्तक दूध उत्पादक, शेतकरी, त रुणांना आणि अभ्यासकांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

A To Z Dairy Farming | ए टू झेड डेअरी फार्मिंग

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like