{"product_id":"a-to-z-dairy-farming","title":"A To Z Dairy Farming | ए टू झेड डेअरी फार्मिंग","description":"\u003cp\u003eजागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना व मागणीला अनुसरून भारतातील दूध उत्पादकांना स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्व दूध उत्पादकांना नवनवीन व प्रात्यक्षिकांसह माहिती देणारे डॉ. पराग घोगळे आणि प्रशांत कुलकर्णी लिखित A. to Z डेअरी फार्मिंग हे पुस्तक! दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथमत: गायी-म्हशी विकत घेतल्यानंतर त्यापासून चांगल्या जातिवंत गायी-म्हशी आपल्या गोठ्यात तयार करण्यासाठी मुख्यत: ‘प्रजनन’, ‘जनावरांचा आहार’, ‘समग्र व्यवस्थापन’ आणि ‘दुधाचे गुणवत्ता नियंत्रण’ या चार गोष्टी महत्त्वाच्या असतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्या समजून घेऊन पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करणे आवश्यक असते. थोडक्यात दूध व्यवसायाकडून दूध उद्योजकतेकडे जाण्याच्या प्रवासासाठी मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आहे. जगभरात गायी-म्हशींच्या सुमारे ८०० प्रजाती आहेत. गायी-म्हशी २० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eगायीला एक नाही तर चार पोटे असतात. त्यांच्या पोटात कोट्यवधी सूक्ष्मजीव असतात. अशा अनेक रंजक गोष्टींचा उलगडा यांमधून होतो. उपलब्ध तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन व आधुनिक व्यवस्थापन आत्मसात करण्यासाठी हे पुस्तक दूध उत्पादक, शेतकरी, त रुणांना आणि अभ्यासकांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270541275219,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BookCover_Front_A_to_Z_Dairy_Farming.png?v=1773661765","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/a-to-z-dairy-farming","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}