{"product_id":"aadharvad","title":"आधारवड | Aadharvad","description":"\u003cp\u003eसुविद्या ही मानवी मूल्यांची जननी असून निकोप समाज रचनेचा ती पाया आहे. हा विवेकविचार शिक्षिका म्हणून ज्यांनी श्वासागणिक जपत आपल्या अध्यापन कार्यकक्षा सक्षम केल्यात त्या खान्देशच्या साहित्य क्षेत्रातील समर्थ, नामवंत लेखिका तथा कवयित्री आदरणीय लतिकाताई चौधरी यांच्या अध्यापन कार्यपूर्ती सोहळ्यानिमित्त प्रकाशित होणाऱ्या कृतज्ञ हृदगतासाठी माझे हे अल्पाक्षरी भाष्य. चणे खावे लोखंडाचे तेथ ब्रम्हपदी नाचे या संतोक्तीचं सारतत्त्व अंतरी जपणाऱ्या या शिक्षिका ताईंनी स्वोद्धारक विद्यार्थी संस्था माझी अन्नपूर्णा आहे ही भावना तब्बल २३+१०= ३३ वर्षे कधीच नजरेआड होऊ दिली नाही.अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अमुच्या आशा किनारा तुला पामराला कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या ओळींची हयातभर पारायणं करीत विद्यार्थी वर्गाची केलेली घडणी, शिक्षिका म्हणून त्यांना समाधान देणारी व कृतकृत्यतेकडे नेणारी निश्चितच आहे. हृदगतातल्या पानापानावर नित्य वंदनीय रावळ परिवाराविषयी कृतज्ञता नोंदवताना त्यांच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक व शैक्षणिक कर्तृत्त्वाविषयी केलेला गौरवोल्लेख ताईंसह वाचकांना धन्य करून जाणारा असून आदरणीय लतिकाताईच्या अंतर्मनाचे नितांत दर्शन देणारा आहे. - प्रा. वा. ना. आंधळे\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281397903443,"sku":"9.78936E+12","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/adharvad_20front.jpg?v=1795505189","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aadharvad","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}