प्रस्तुत पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात राजकीय विचारांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, महात्मा गांधीजींचा जीवन परिचय, सत्य, अहिंसा, सत्याग्रह, विश्वस्त, स्वराज्य आणि हिंद स्वराज्य इत्यादी प्रमुख संकल्पनांची चर्चा केलेली आहे. दुसर्या प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन परिचय, त्यांचे जात, वर्ण, अस्पृश्यता, राज्यघटना, संविधानवाद, समानता, मूलभूत हक्क, सामाजिक न्याय ,आरक्षण, महिला स्वातंत्र्य आणि हिंदू कोड बिल इत्यादी मुख्य संकल्पनांबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. तिसर्या प्रकरणात महात्मा गांधीजींचे राजकीय आणि सामाजिक कल्याण संदर्भातील अस्पृश्यता, सांप्रदायिक सद्भाव, महिला, शिक्षण, राष्ट्रवाद, धर्म आणि राजकारण, शेतकरी, कामगार, अल्पसंख्यांक, आदिवासी इत्यादी वर्गा विषयीच्या विचारांचे सविस्तर विश्लेषण केलेले आहे. चौथ्या प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय आणि धार्मिक विचार विषद केलेले आहेत. त्यात राष्ट्र, राष्ट्रवाद संसदीय लोकशाही, राज्य समाजवाद, धर्मनिरपेक्षता, हिंदू धर्माबाबत विचार, बौद्ध धर्म आणि धर्मांतर इत्यादी महत्वपूर्ण विचार विषद केलेले आहेत.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours