'आपले आकाश' ह्या पुस्तकामध्ये आकाशातील आकाशगंगा व विविध ताऱ्यांविषयीची माहिती
खूपच सुंदरशा भाषेत दिली आहे. विश्वाची निर्मिती कशी झाली, खगोल कशाला म्हणतात, आकाशात आकाशगंगा, तारे, ग्रह व ग्रहमालिका कशा निर्माण होतात, ते कसे फिरतात, वैश्विक किरण कसे असतात, वेधशाळा म्हणजे काय, दुर्बिण व रेडिओ दुर्बिण कशी असते, अंतराळ, आकाश व अवकाश म्हणजे काय, परग्रह म्हणजे कोणते ग्रह, ह्या विश्वात कोठेतरी सजीव असतील का, असतील तर ते कसे असतील इ. माहिती मुलामुलींना सहजगत्या समजेल अशा भाषेत सांगितली आहे.
आकाशात तारे चालतांना कसे दिसतात, ताऱ्यांचा प्रकाश आपणापर्यंत कसा पोहचतो, तारे कसे लुकलुकतात, सूर्याचा प्रकाश स्थिर का दिसतो, ताऱ्यांचे रंग वेगवेगळे का असतात, सारे तारे आपणास सारख्याच अंतरावर का दिसतात, आपली सूर्यमाला कशी निर्माण झाली, तारे दिवसा का दिसत नाहीत, तारा कसा तुटतो, वेगवेगळ्या रंगांच्या उल्का कशा दिसतात असे मुलांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सहजगम्य भाषेत दिली आहेत.
ताऱ्यांचे पृथ्वीपासून अंतर कसे मोजतात, जोडतारे कसे असतात, श्वेत बटू तारे, खुजे तारे कसे असतात, ताऱ्यांचे स्फोट कसे होतात, धूमकेतू कसे असतात, नक्षत्रे म्हणजे काय, ध्रुव तारा उत्तरेलाच का आहे, तेजोमेघ कसे असतात, नवतारा, अतिनवतारा, न्यूट्रॉन तारा कसा असतो, पल्सार्स व क्वासार्स म्हणजे काय, रेडिओ तारे, कृष्णविवरे कसे असतात आदि माहिती त्यातील कठिणता टाळून सहजसुलभ व रंजक भाषेत वर्णिलेली आहे.
अशी ज्ञानवर्धक सोपी माहिती मुलामुलींना तर उपयुक्त आहेच पण जिज्ञासू शिक्षक व पालकांनासुध्दा उपयोगी आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours