{"product_id":"aarogya-manasshastra","title":"आरोग्य मानसशास्र | Aarogya Manasshastra","description":"\u003cp\u003e‘आरोग्य मानसशास्र’ ही मानसशास्राची एक महत्त्वपूर्ण शाखा असून, ती व्यक्तीच्या आरोग्य, आजार, ताण, आरोग्यवर्तन, उपचारांचे पालन, जीवनशैली, समायोजन प्रक्रिया आणि जीवन-गुणवत्ता यांचा जैविक, मानसशास्रीय आणि सामाजिक यासंदर्भात अभ्यास करते. आधुनिक आरोग्यविषयक समस्यांचे स्वरूप दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. संसर्गजन्य आजारांबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्थूलता, कर्करोग, मानसिक ताण, चिंता, नैराश्य आणि जीवनशैलीशी संबंधित विकार यांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्याचा विचार केवळ शारीरिक आजार किंवा वैद्यकीय उपचारांच्या चौकटीत न करता व्यक्तीचे विचार, भावना, वर्तन, सवयी, सामाजिक आधार, कुटुंब, सांस्कृतिक घटक आणि पर्यावरणीय परिस्थिती यांच्यासंदर्भात करणे आवश्यक ठरते. याच व्यापक आणि समग्र दृष्टिकोनाचा अभ्यास आरोग्य मानसशास्र या शाखेत केला जातो. प्रस्तुत पुस्तकात आरोग्य मानसशास्राची व्याख्या, स्वरूप, उद्दिष्टे, आरोग्याचे सामाजिक, भावनिक, संज्ञानात्मक व शारीरिक घटक, जैव-मनो-सामाजिक मॉडेल, मानसिक आरोग्य आणि दीर्घकालीन आजार, ताणाचे स्वरूप व परिणाम, साधक वर्तन, आरोग्यवर्तन, आरोग्यवर्धक व आरोग्य हानिकारक वर्तन, तसेच आरोग्यसंरक्षक वर्तन आणि आजारांचे व्यवस्थापन यांसारख्या संकल्पनांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला असून विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, संशोधकांसाठी तसेच आरोग्य, समुपदेशन आणि जीवनकौशल्य शिक्षणाशी संबंधित अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे. आरोग्य हे केवळ आजारांचा अभाव नसून, व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक कल्याणाशी निगडित असलेली एक गतिशील प्रक्रिया आहे, ही जाणीव या पुस्तकाच्या माध्यमातून अधिक स्पष्ट आणि समृद्ध होईल, असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281413566547,"sku":"9.78936E+12","price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Arogya_20manasshastra_20Front.jpg?v=1795505373","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aarogya-manasshastra","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}