डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे. का नसावा ? त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला; त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला : त्यांनी वेलीसारख्या वेटोळे घालून बसलेल्या मराठी कादंबरीला घनदाट अरण्याचे रूप दिले.
मीच हे सांगितलेपाहिजे अशा स्वभावाचे शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी मोहित केले - आशावादी कादंबरीस जोडमथळा देणे हे केतकरांचे एक खास वैशिष्ट्य : त्यातून कादंबरीकार एकाच वेळी काव्यात्मता व वास्तवात यांचे संसूचन करतो : जसे, आशावादी अथवा एका प्रवाहपतिताचे चरित्र ही १९२७ ची कादंबरी. ह्या कादंबरीतील प्रवाहपतित आहे ब्रह्मगिरीस्वामी. ह्या स्वामीच्या रूपाने कादंबरी राजकारण, समाजकारण, धर्मकारण यांचा विशाल पट साकार करते. कुसुमावती देशपांडे यांच्यासारख्या चोखंदळ समीक्षिकेने या कादंबरीचा गौरव केला आहे , एवढे सांगितले म्हणजे पुरे !
- डॉ. द. भि. कुलकर्णी हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours