◆ आजकालच्या धकाधकीच्या युगामध्ये आपण सर्वजण आपला आत्मा व त्याला आवश्यक असलेला आनंद हरवू लागलेलो आहोत.जर आपल्या आत्म्याला आनंद नसेल तर जगण्यामध्ये उत्साह किंवा जोश कसा राहील? हे संपूर्ण पुस्तक आत्मानंद मिळवून देण्यावर लिहिलेले आहे.या आत्मानंदाचा शोध प्रत्येकानी आपल्या स्वतःसाठी घेणे व तो मिळविणे अत्यंत गरजेचे आहे. जीवनातील सर्वांत मूलभूत आनंद म्हणजे आत्मानंद. त्याविषयी सोप्या मराठीत,खेळकर भाषेत सोदाहरण विवेचन करणारे हे एक मुक्तचिंतन आहे.....मला भावले....तुम्हाला ही आवडेल. -डॉ. श्री.ग. बापट,माजी कुलपति,टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
◆ आत्मानंद प्राप्तीही विशाल सागरासारखी आहे- म्हटलं तर सरळ-सोपी;म्हटलं तरगुंतागुंतीची!सरळ-सोप्यामार्गानेही आत्मानंद प्राप्त करता येतो आणि हीच गोष्ट आदरणीय आत्मानंदी प्रा. डॉ.सुभाष यशवंतराव पवार यांनी त्यांच्या 'आत्मानंद-एकविचार' यावैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात मांडली आहे. वास्तविकत: हे केवळ वैचारिक पुस्तक नसून नित्य पाठ करावा असा ग्रंथ आहे. -श्री. राजेंद्रखेर
Pickup available at HO
Usually ready in 24 hours