Skip to product information
आतून तुटलेली माणसे | Aatun Tutleli Manse
Sale price  Rs. 296.00 Regular price  Rs. 395.00
Pages: 220
Language: Marathi

श्रीपाद भालचंद्र जोशींच्या कविता सामान्य विषयांच्या साच्यात अभिव्यक्त होत नाही. तिचा वावर सर्वक्षेत्रीय आहे. मुक्तसंचार ही तिची प्रवृत्ती आहे. म्हणूनच प्रेम, निसर्ग, राष्ट्र, इतिहास, सामाजिकता, अध्यात्म, सुखारणा, अंधश्रद्धा, विकृती, धर्म संस्कृती, विश्व अशा असंख्य विषयासंबंधीच्या अनुभूती काव्यविश्वात अभिव्यक्त झाल्यात... श्रीपाद भालचंद्र जोशींच्या काव्यात्म विश्वात ईश्वरी आणि निरीश्वरवादी दोन्ही मानवतावादाचे संचित एकात्म झालेय. विज्ञान आणि अध्यात्म या द्वंद्वाचे पुण्य एकवटले आहे. मानवनिर्मित सर्व प्रयोग व प्रयत्नशील विधायक संचितांची सारांशात्म बेरीज मराठीत फक्त श्रीपाद भालचंद्र जोशींच्या कवितेतच आढळते.... प्रगल्भ चिंतनशीलता, बहुप्रवाही संचिताची बेरीज आणि जीवनाची समग्र जाणीव ही श्रीपाद भालचंद्र जोशींच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. मानवी जीवनाची समग्रता व संपूर्णता सर्व प्रवाही दोषांचा निषेध करून, केवळ पुण्याची पेरणी करणारी कविता श्रीपाद भालचंद्र जोशींनी लिहिली. मराठी बहुसांस्कृतिकतेची पुण्याई कोणत्याही लेबलशिवाय अभिव्यक्त करणारी कविता म्हणून श्रीपाद भालचंद्र जोशींच्या कवितेचे मूल्य श्रेष्ठ व चिरंतन टिकणारे आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

आतून तुटलेली माणसे | Aatun Tutleli Manse

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like