सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. निर्यात-आयात यांची भूमिका देशाच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. निर्यात वाढल्यास परकीय चलनाची प्राप्ती होते, ज्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यात वाढ होते. या माध्यमातून नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळते, रोजगारनिर्मिती होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशाची विश्वासार्हता निर्माण होते. दुसरीकडे, आयातही देशाच्या प्रगतीसाठी तितकीच महत्त्वाची ठरते. कारण आयातीमुळे प्रगत तंत्रज्ञान, औद्योगिक यंत्रसामग्री, संशोधन साहित्य तसेच विकासासाठी आवश्यक असणारा कच्चा माल देशांतर्गत बाजारात उपलब्ध होतो. यामुळे उत्पादनक्षमतेत वाढ होते आणि देशाच्या औद्योगिक क्षेत्राचा दर्जा उंचावतो. प्रस्तुत पुस्तकात परकीय व्यापाराच्या संकल्पना, निर्यात-आयात प्रक्रियेची पायरी, आवश्यक कागदपत्रांची माहिती, सरकारी धोरणे, तसेच परकीय व्यापाराशी संबंधित विविध संस्थांचे कार्य यांचा सखोल ऊहापोह केला आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असण्याबरोबरच हे पुस्तक स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे ठरेल. तसेच व्यापार क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या तरुणांसाठी आणि जागतिक पातळीवर व्यवसाय विस्तार करू पाहणार्या उद्योजकांसाठीही हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरणार आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours