समाजाच्या बदलत्या मागण्या व गरजा या अनुषंगाने विद्यापीठांना अभ्यासक्रमामध्ये सतत बदल करावे लागत असतात. त्याच दृष्टिकोनातून NCTE 2014 च्या नियमानुसार B. Ed. (2 years Annual Pattern - CBCS) चा नवीन अभ्यासक्रम लागू केला आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या नवीन अभ्यासक्रमांची पुनर्रचना २०१९-२० पासून करण्यात आली. अत्यंत महत्त्वपूर्ण व नावीन्यपूर्ण सकारात्मक बदल नवीन अभ्यासक्रमामध्ये केले आहेत. अभ्यासक्रमातील प्रथम वर्षासाठी ‘अभ्यासक्रमांतर्गत भाषा व ज्ञान आणि अभ्यासक्रम’ (CC - PE 3) हा विषय ठेवण्यात आला आहे. या विषयासाठीचे विद्यार्थी व शिक्षकांना जास्तीत जास्त उपयोग होईल तसेच अभ्यासक्रमाला धरून राहील या दृष्टीने प्रश्नोत्तर स्वरूपात प्रस्तूत पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रस्तुत ग्रंथात एकूण आठ प्रकरणे आहेत. सर्वच प्रकरणे ही मुद्देसूद लिहिण्याचा व साध्या, सरळ भाषेत प्रश्नोत्तर स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours