‘अभ्युदय’ ही रामकथेवर आधारित, जुन्या रामकथेत नवे विचार गुंफणारी हिंदीतील पहिली आणि महत्त्वाची कादंबरी मानली जाते. ‘दीक्षा’, ‘अवसर’, ‘संघर्ष की ओर’ आणि ‘युद्ध’ या खंडांच्या एकत्रित अशा अनेक आवृत्त्या आजवर प्रकाशित झाल्या आहेत. ओडिया, कन्नड, मल्याळम, नेपाळी, आणि इंग्रजी भाषांमध्ये तिच्या विविध खंडांचे अनुवादही वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत.
‘अभ्युदय’ वाचताना रामकथेबाबत एक महत्त्वाचे निरीक्षण आपल्या लक्षात येते ते असे की ही एखाद्या दूरच्या, अनोळखी काळात घडणारी गोष्ट नसून आपल्या समाजातील आणि जीवनातील प्रश्नांशी बोलणारी ही खऱ्या अर्थाने अभिजात अशी कथा आहे. प्रसिद्ध कथानकाचा आधार असूनही ‘अभ्युदय’ ही स्वतंत्र आणि मौलिक कादंबरी आहे यात अजिबात शंका नाही. विशेष म्हणजे तिच्यात अलौकिक किंवा अतिप्राकृतिक काही नाही; उलट, आपल्या जीवनाचे आणि समाजाचे प्रतिबिंब दिसते, जे अधिक महत्त्वाचे साहित्यिक लक्षण मानले जायला हवे.
गेल्या पंचवीस वर्षांत या कादंबरीने भारतीय साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहेच. आता तिचा मराठी अनुवाद श्री मधुकर पेठे यांच्या निधनानंतर वाचकांपर्यंत पोहोचत आहे. या कादंबरीचे हिन्दी साहित्यातले स्थान जसे बळकट आणि स्थिर आहे तसेच मराठी साहित्यात देखील बळकट होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours