{"product_id":"abraham-lincoln-chi-jeevan-kahani-by-kamlesh-soman-jeevan-anandgaonkar","title":"Abraham Lincoln chi Jeevan Kahani | अब्राहम लिंकनची जीवन कहाणी By Kamlesh Soman, Jeevan Anandgaonkar| डॉ कमलेश सोमण ,जीवन आनंदगांवकर","description":"\u003cp\u003eअमेरिकेच्या अध्यक्षांपैकी ज्यांची गणना थोर राष्ट्रनेत्यांत केली जाते, त्यात\u003cbr\u003eअब्राहम लिंकनला मानाचे स्थान आहे. प्रसंगी युद्धासारखा कठोर उपाय योजण्यास, मागेपुढे न पाहता, त्याने राष्ट्राचे ऐक्य राखले. अमेरिकेच्या समाजव्यवस्थेतील व अर्थव्यवस्थेतील कलंक असलेली गुलामगिरीची पद्धत त्यांनी नाहीशी केली. अध्यक्ष या नात्याने त्यांच्या हाती फार मोठी सत्ता होती. यादवी युद्धाच्या वेळी तर, त्यांना व्यापक अधिकार प्राप्त झाले होते. तरीही त्यानी त्या सत्तेचा कोणत्याही अवाजवी कारणासाठी केव्हाही व कधीही उपयोग केला नाही. म्हणूनच आज अब्राहम लिंकन यांना लोकशाहीचे प्रतीक मानले जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयादवी युद्धाच्या काळात अब्राहम लिंकन यांच्या खंबीर नेतृत्त्वाचे दर्शन सर्वांनाच झाले.अनेक प्रकारच्या विरोधांना तोंड देऊन त्याने राष्ट्राचे ऐक्य- अखंडत्त्व अबाधित राखले. युद्ध चालू असतानाच, त्यात धारातीर्थी पडलेल्यांच्या स्मरणार्थ गोटसबर्ग येथे लिंकनने जे भाषण केले, ते जगाच्या इतिहासातील मोजक्या वक्तृत्वपूर्ण व प्रभावी भाषणात गणले जाते. 'आमचे सरकार लोकांचे, लोकांनी चालवलेले व लोकांसाठी काम करणारे आहे. त्याला कळीकाळाचीही भीती नाही'. हे त्यांचे त्या भाषणातील स्फुर्तिदायक चिरस्मरणीय व प्रेरणादायी उद्गार आहेत.\u003c\/p\u003e","brand":"GOEL PRAKASHAN","offers":[{"title":"Default Title","offer_id":67607700766803,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/AbrahamLincolnFront.webp?v=1791276914","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/abraham-lincoln-chi-jeevan-kahani-by-kamlesh-soman-jeevan-anandgaonkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}