शेअर मार्केट हे गर्दी-समूहाचे मानसशास्त्र आहे. शेअरमार्केटमध्ये फायदा मिळण्याच्या दृष्टीने अनेक नवोदित दिवसेंदिवस या क्षेत्राकडे आकृष्ट होत आहेत. शेअरची खरेदी आणि विक्री कधी करायची, त्यांचे नवीन नियम काय आहेत, आलेखाचे वाचन कसे करायचे, व्हॉल्युमचे महत्त्व, पीई रेशो, आपला पोर्टफोलिओ किती असावा, म्युच्युअल फंड, संस्थात्मक फंड, गुंतवणुक करताना कोणत्या चुका करू नयेत अशा अनेक विषयांवर हे पुस्तक मार्गदर्शन करते. भारतीयांनी परदेशी बाजारात कशी गुंतवणूक करावी याची माहिती वाचकांना होईल, हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
हे पुस्तक काही श्रीमंत लोकांसाठी लिहिलेले नाही तर सर्वसाधारण माणसास उत्तम आर्थिक मिळकतीची संधी मिळावी, हा याचा मुख्य उद्देश आहे. सर्वसाधारण गुंतवणूकदारांना हे पुस्तक खचित उपयोगी पडेल आणि शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अधिकाधिक मराठी माणूस पुढे येईल हे निश्चित.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours