Skip to product information
अहिराणी बोलीतील लग्नगीते, लोकगीते आणि ओवीगीते | Ahirani Bolitil Lagnagite, Lokgite Aani Ovigite
Rs. 188.00
Pages: 124
Language: Marathi

लोकसाहित्य ही एक व्यापक संकल्पना आहे. त्यात लोकगीते, लोककथा, लोकनाट्य, ओवीगीते ही आविष्कार रूपे, म्हणी, वाक्प्रचार, उखाणे अशी भाषिक अभिव्यक्ती रूपे तसेच विधिविशेष श्रद्धा, समजुती, रुढी-परंपरा, सण-समारंभ, उत्सव यांचाही समावेश होतो. लोकसाहित्य हे लोकांच्या दैनंदिन जगण्याचाच एक अविभाज्य घटक आहे. लोकसाहित्यात लोककथा आणि लोकगीतांचा मोठा साठा आहे. मनोरंजनासाठी आणि श्रमपरिहारासाठी लोकगीते गायली जात होती. दळण-कांडण करताना, शेतीची विविध कामे करताना, विविध सण-समारंभ-उत्सव-विधीच्या वेळी मोठ्या प्रमाणात ओवीगीते व लोकगीते गायली जात होती. आज मात्र ती गीते गाणारे आणि ऐकणारेही कमी झालेले आहेत. लोकसाहित्य बोलीभाषेत असते पण आज बोलीभाषाही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे त्या बोलीतील मौखिक धन नष्ट होत असल्यामुळे अहिराणी बोलीतील हे मौखिक धन संकलित करून लिखित स्वरूपात संग्रहित करून आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याची, संवर्धन करण्याची आणि संपादन करून पुढील पिढीच्या हाती सोपवण्याची गरज निर्माण झाली आहे. अहिराणी भाषेतील विविध लग्नगीते, लोकगीते व ओवीगीते संकलित करून सदर पुस्तकातून पुढील पिढीसाठी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

अहिराणी बोलीतील लग्नगीते, लोकगीते आणि ओवीगीते | Ahirani Bolitil Lagnagite, Lokgite Aani Ovigite

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like