{"product_id":"ahirani-ovigitancha-chikitsak-abhyas","title":"अहिराणी ओवीगीतांचा चिकित्सक अभ्यास | Ahirani Ovigitancha Chikitsak Abhyas","description":"\u003cp\u003eडॉ. रमेश सूर्यवंशी यांनी अहिराणी बोलीभाषेचे आजवर फार मौलिक संशोधन केले आहे. अहिराणी बोलीचा विविध दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास केला आहे. त्यांनी 'अहिराणी ओवीगीतांचा चिकित्सक अभ्यास' या संशोधनपर ग्रंथातून अहिराणी ओव्यांमधील खानदेशातील लोकरूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, समजूती देव-देवतांवरील श्रद्धा ऐतिहासिक, पौराणिक कथा समाज, संस्कृती, विविध स्थळे व व्यक्ती विशेष, खाद्यसंस्कृतीची विविधता, गृहरचनेचे वेगळेपण, शृंगारभावना, इत्यादी अंतर्भूत असलेल्या ओव्यांचा चिकित्सक अभ्यास केला आहे. तसेच प्रस्तुत अभ्यासातून अहिराणी ओव्यातून प्रकट झालेले सामाजिक, सांस्कृतिक व कौटुंबिक जीवन, मानवी नातेसंबंधावर भाष्य केले आहे. त्याचबरोबर स्त्रियांच्या कौटुंबिक व सामाजिक स्तरावरील स्थितीविषयी विचारमंथन केले आहे. ओव्यातून आढळणाऱ्या शब्दकोशाचे वैभव व सामाजिक संकेताचे वेगळेपण आदिबाबत सखोल चिंतन मांडले आहे. तसेच ओव्यांचा शैली वैज्ञानिक दृष्टिकोनही मांडला आहे. शिवाय ओव्यांमधील प्रकटलेले चिंतन, तत्त्वज्ञान, बोध, सूचकता, मार्मिकता यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. प्रस्तुत संशोधनासाठी संशोधकाने साध्या- सोप्या भाषेची योजना केली आहे. म्हणून आधुनिक युगातही या अहिराणी ओव्यांचे आणि प्रस्तुत संशोधन ग्रंथाचे महत्त्व आबादित राहील एवढे सामर्थ्य या संशोधनात आहे. - डॉ. रमेश माने\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281395904595,"sku":"9.78936E+12","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ahirani_20ovigitancha_20chikitsak_20abhyas_20front.jpg?v=1795505157","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ahirani-ovigitancha-chikitsak-abhyas","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}