{"product_id":"aitihasik-nondee-durganchya-jilha-pune-by-sandeep-paranjape","title":"Aitihasik Nondee Durganchya Jilha Puneऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या जिल्हा पुणे |By Sandeep Paranjape|संदीप परांजपे","description":"\u003cp\u003eऐतिहासिक नोंदी दुर्गाच्या हा ग्रंथ गड किल्ले व कोट या विषयावर पी.एच.डी. चे संशोधन किंवा पदव्युत्तर संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी खूप महत्वाचा आहे. सदर ग्रंथ लिहिताताना लेखकाने पुस्तकाची रूपरेषा ठरवून आपले लक्ष दुर्गाच्या इतिहासावर केंद्रित केलेले आहे. शिवकालीन व पेशवेकालीन इतिहासाच्या साधनांमध्ये या दुर्गांची माहिती विखुरलेल्या स्वरुपात होती. पुणे जिल्ह्यातील २८ दुर्गाची ससंदर्भ माहिती एकत्रितपणे एकाच पुस्तकात दिल्यामुळे अभ्यासकांना संदर्भशोधणे सोपे जाईल, जेष्ठ अभ्यासक रमाकांत पाळंदे यांच्या अप्रकाशित सूचीचा सदर लेखनामध्ये लेखकाने योग्य प्रकारे उपयोग केला आहे. शिवपूर्वकालीन आणि शिवकालीन नोंदींची कमतरता असल्याने सदर ग्रंथामध्ये पेशवेकालीन नोंदी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. पेशवेकाळात जरी किल्ल्यांचे महत्व कमी झाले असले तरी ते संपलेले नव्हते.\u003cbr\u003eसदर ग्रंथामध्ये नकाशे आणि जुन्या छायाचित्रांचा देखील समावेश केलेला असल्याने पुणे जिल्ह्यातील दुर्गावर काही वर्षांपूर्वी काय परिस्थिती होती याचा अंदाज अभ्यासकांना आणि वाचकांना येऊ शकेल. पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांच्या यादीमध्ये लोहगड एका अत्यंत महत्वाच्या किल्ल्याचा समावेश आहे. लोहगड किल्ल्याला काही महिन्यांपूर्वीच युनेस्कोने जागतिक मानांकन हा दर्जा दिलेला आहे. लोहगड तसेच पुणे जिल्ह्यातील इतर किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीकोनातून सदर ग्रंथातील ऐतिहासिक नोंदी व फोटो महत्वाचे ठरतील.\u003cbr\u003eडॉ. सचिन विद्याधर जोशी\u003cbr\u003eपुरातत्त्वविभाग, डेक्कन कॉलेज, पुणे.\u003c\/p\u003e","brand":"SHRI SHIVSAMARTHSEVA Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44881381556307,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_4e9c647c-1208-47a7-9074-881c08f8cad0.jpg?v=1780139298","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aitihasik-nondee-durganchya-jilha-pune-by-sandeep-paranjape","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}