आधुनिक युगाने मानवासाठी निर्माण करून दिलेली अनमोल सेवा म्हणजे ‘रेडिओ प्रसारण’. सरोजिनी नायडू
गेल्या नऊ दशकांपासून ‘ऑल इंडिया रेडिओ’ अर्थात, ‘आकाशवाणी’ भारतीयांच्या कानां मनांत गुंजन करत आहे. रेडिओवरील बातम्यांतून श्रोते देश-विदेशातील घटना-घडामोडींशी परिचित होतात तर रेडिओवरील वैविध्यपूर्ण कार्यक्रमांतून त्यांचे सकस मनोरंजनही होत असते आणि त्याचबरोबर ज्ञानप्राप्तीही ! आकाशवाणी श्रोत्यांशी अनेक प्रकारे संवादही साधत असते. म्हणूनच श्रोते ‘रेडिओ’शी जिव्हाळ्याने जोडून आहेत.
या पुस्तकात ‘आकाशवाणी’ची सुरुवातीपासूनची गोष्ट सांगत लेखक नव्वद वर्षांच्या प्रवासातील रंजक कथाही आपल्याबरोबर ‘शेअर’ करतात. त्याचप्रमाणे त्यांनी रेडिओवरील अनेक निर्माते, अनाउन्सर्स, रेडिओ जॉकी, श्रोते आदी रेडिओवरील घटकांनाही बोलतं केलं आहे.
सर्वसामान्य भारतीयांच्या जिव्हाळ्याच्या माध्यमाविषयीच्या माहितीचा, आठवणींचा खजिना असलेलं पुस्तक… आकाशवाणी
Pickup available at HO
Usually ready in 24 hours