भारतात तर प्रमुख पर्यटन स्थळेच इतकी आहेत की सारी फिरायला अनेक सहली कराव्या लागतील. आडवाटेची सौंदर्य स्थळे त्याहून अधिक आहेत. या सगळ्या ठिकाणांचा आढावा घेणे अशक्य असले तरी या पुस्तकात काही सहलींची माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय पर्यटकाची मानसिकता ही, 'एका ठिकाणी राहून चार आठ दिवस आराम करणे' यापेक्षा आजूबाजूला फिरुन आणखीन काही नवीन पाहावे, अनुभवावे अशी असते. म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात विविध प्रकारच्या सहलींची माहिती दिली आहे. उंचीवरचे पर्यटन (हिल स्टेशन्स नाहीत), जंगल पर्यटन, किनारी पर्यटन, सागरी पर्यटन, दुर्लक्षित शहरातील प्रेक्षणीय स्थळे असे पर्यटनाचे विविध प्रकार आहेत. शिवाय परदेशातील काही अत्यंत वेगळी स्थळे यात समाविष्ट केली आहेत. ही सारी स्थळे लेखकांनी स्वतः अनुभवली आहेत आणि त्यांचे अनोखेपण वाचकांना आवडेल याची खात्री आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours