{"product_id":"apala-parisar-आपला-परिसर-by-prof-sharad-chaphekar-प्रा-शरद-चाफेकर","title":"Apala Parisar | आपला परिसर By Prof. Sharad Chaphekar | प्रा. शरद चाफेकर","description":"\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan\u003eवास्तविक पर्यावरणाचा विचार आपल्या नजीकच्या परिसरापासून सुरु झाला पाहिजे. कारण आपला परिसर, त्यातील घटक, त्या घटकांचे एकमेकांशी असलेले नाते-संबंध, या सर्वांचा आपल्यावर परिणाम होत असतो. म्हणजेच, आपणही आपल्या परिसराचा एक घटक आहोत, ही भावना प्राथमिक शिक्षणापासून मनावर बिंबवणे जरुरीचे आहे. यासाठी परिसराची शास्त्रशुद्ध माहिती सहज, सोप्या भाषेत मुलांना सांगण्याची जरुरी आहे. हाच दृष्टिकोन ठेवत हे पुस्तक लिहिलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan\u003eखरंतर शाळकरी मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. त्याच संदर्भाने मुलांशी संवाद साधत त्यांना पर्यावरणीय प्रश्नांची उत्तरं शोधण्याची संधी उपलब्ध करून दिली, तर पर्यावरण संवर्धनाचं काम सोपं होऊ शकेल. हाच धागा पकडून एका चमूच्या माध्यमातून आपल्या परिसराची गोष्ट या पुस्तकात मांडली आहे. ती मुलांसह शिक्षक, पालकांनीही वाचावी अशी आहे. ती आपल्याला आपला परिसर समजावून देतानाच पर्यावरणीय अंगाने परिसराची काळजी घेण्याचं नवं भानही देते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46136885674067,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/aplaparisar.jpg1-800x800.jpg?v=1788433893","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/apala-parisar-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0-by-prof-sharad-chaphekar-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a6-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}