Skip to product information
The Art Of Laziness | Attitude Is Everything | द आर्ट ऑफ लेझिनेस | अ‍ॅटिट्यूड इज एव्हरिथिंग | दृष्टिकोन म्हणजे सर्वकाही | by Jeff Keller avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00
Language: Marathi

आळशीपणावर मात करणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे. एकूण २० टक्क्यांहून अधिक प्रौढ आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चालढकल करण्याच्या वृत्तीमुळे यश मिळवण्यात किंवा उद्दिष्ट गाठण्यात अडथळे येतात. सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळेही आळशीपणा वाढत चालला आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने या समस्येतून बाहेर पडण्यासाठी अगदी साधे-सोपे उपाय सुचवले आहेत. तसंच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही उपयुक्त आणि सहज अमलात आणण्याजोग्या सूचनाही दिल्या आहेत. आळशीपणा दूर करून महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्या गोष्टी अशा : उत्पादकता वाढवण्यासाठी स्वतःला चांगल्या सवयी लावणं. चालढकल करण्याच्या वृत्तीवर विजय मिळवणं. ध्येयं निश्चित करून त्यांची पूर्ती करणं.

आळशीपणा आणि वाईट सवयी बदलणं कठीण आहे. तुमच्यात हा अवघड; पण सकारात्मक बदल घडवून यशस्वी जीवनासाठी कार्यक्षम जीवनशैली विकसित करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही. दृष्टिकोन ही एक निवड आहे ! सन १९८५ मध्ये नकारार्थी विचार मनात ठेवून, निराश होऊन मी एकटाच माझ्या अभ्यासिकेत बसलो होतो. वकिलीच्या माझ्या व्यवसायात मी जवून खाक झालो होतो आणि मला तसुभरही कल्पना नव्हती की, ही परिस्थिती मी कशी बदलू शकेन. मला काही ध्येये नव्हती… स्वप्ने नव्हती….माझ्यात ऊर्जाच नव्हती. नंतर मी असा एक शोध लावला की, ज्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. मला सकारात्मक सामर्थ्याचा शोध लागला. जसा मी माझा दृष्टिकोन बदलला तसं मला पूर्ण जगच नव्याने खुल झालं.

मी एवढा उल्हसित झालो होतो की, व्यक्तिगत विकासाच्या तत्यांचा मी सखोल अभ्यासच करायला सुरुवात केली. यशाच्या ज्या तत्यांनी माझ्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणते, त्यासंबंधीची माहिती इतरांना देण्याची मोठी स्वप्ने मी उराशी बाळगायला सुरुवात केली होती. सन १९९२ मध्ये हे स्वप्न अमलात आणायचे मी ठरविले आणि मी माझी वकिली थांबवून प्रेरणात्मक व्याख्यान देणारा बक्ता आणि लेखक म्हणून कारकीर्द करायची ठरविले. तुमच्या स्वतःच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करून आणण्याचे आणि यश व पूर्तता याबाबतची नवी उंची गाठण्याचे सामर्थ्य तुमच्यात सुद्धा आहे. तुमची वृत्ती सकारात्मक…नकारात्मक… किंवा त्यादरम्यान कुठेही असली तरी पुस्तक तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसे नियंत्रण ठेवायचे याबाबत मार्ग दाखवेल आणि तुमच्या अविश्वसनीय कुस्तीला वाट करून देईल. या पुस्तकातील १२ प्रकरणे शिकून आणि ती अंगीकारून तुम्ही चैतन्यमय व्हाल. तुम्ही नवीन शक्यता पडताढून पहायला सुरुवात करात तुमच्या विलक्षण गुणवत्तेला विकसित करण्यासाठी तुम्ही कृतिशील व्हाल….आणि तुम्ही असामान्य परिणाम साध्य कराल. हे पुस्तक असे आहे की, जे तुम्हाला तुमची वृत्ती बदलायला आणि तुमच्या जीवनात बदल घडवून आणायला शिकवेल! – जेफ केलर हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

The Art Of Laziness | Attitude Is Everything | द आर्ट ऑफ लेझिनेस | अ‍ॅटिट्यूड इज एव्हरिथिंग | दृष्टिकोन म्हणजे सर्वकाही |

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like