Skip to product information
The Art Of Being Alone | Attitued Is Everthing | Drushtikon Mhanjech Sarvakahi द आर्ट ऑफ लेझिनेस | अ‍ॅटिट्यूड इज एव्हरिथिंग | दृष्टिकोन म्हणजे सर्वकाही || by Jeff Keller avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 338.00 Regular price  Rs. 375.00

स्वतःचे बनायला शिका. आपण अशा जगामध्ये राहतो, जिथे कोणीही व्यक्ती व कोणतीही गोष्ट आपल्यासोबत कायमची राहू शकत नाही. आपण अतिउत्पादनक्षम वातावरण निर्माण केले आहे, ज्यामध्ये तुमच्या मित्रांना कामाच्या अधिक चांगल्या संधींसाठी दुसऱ्या शहरात जावे लागू शकते किंवा तुम्हाला अभ्यासासाठी तुमच्या कुटुंबापासून दूर जावे लागू शकते. या सतत बदलत असलेल्या चित्रात तुम्ही एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे, एकटे असणे म्हणजे एकाकी असणे नव्हे. तुम्ही तुमच्यासोबत आहात एवढाच त्याचा अर्थ आहे ! ‘द आर्ट ऑफ बीइंग अलोन’ या पुस्तकातून तुम्ही तुमच्या एकटेपणाचे रूपांतर ‘एकांतात’ कसे करायचे ते शिकाल. तसेच, एकटे राहण्याच्या कलेत कसे पारंगत व्हायचे ते शिकाल आणि तुमचे ‘सध्याचे आयुष्य’ तुमच्या ‘स्वप्नातील आयुष्यामध्ये’ रूपांतरित कसे करायचे तेही शिकाल. • तुमचा एकटेपणा एकांतात कसा रूपांतरित करायचा ?

• एकटेपणाचे मूळ कारणच नष्ट करून एकटेपणाचे भय कसे दूर करायचे ? स्वतःच्याच प्रेमात पडण्यासाठी स्वतःला कसे जाणून घ्यायचे व आपल्या अंतरंगात खोलवर दडलेला ‘स्व’ कसा ओळखायचा ? • एकांताची गोडी कशी लावून घ्यायची व तो प्रगतीचा काळ कसा बनवायचा ? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचावे असे पुस्तक – ‘द आर्ट ऑफ बीइंग अलोन. रेणुका गवरानी यांना त्यांचे अनुभव व निरीक्षणे यांविषयी लिहायला आवडते. रेणुकांचे पहिले पुस्तक आहे – ‘द वूण्डस् ऑफ माय वर्डस्.’ प्रस्तुत पुस्तकातून जीवन जगण्याविषयीचे धडे मिळतात. जेव्हा तुम्ही तुमच्या यशास पाठबळ मिळेल अशा पद्धतीने विचार करता, बोलता आणि तशी कृती करता, तेव्हा तुम्ही यशाची दारे खऱ्या अर्थाने सर्व बाजूने ठोठावत असता… आणि जीवनातील तुमच्या अपूर्व अशा यशाच्या मार्गाने वाटचाल करीत असता. तुम्ही अशा प्रवासाचा आरंभ करीत आहात की, जो तुम्हाला स्वप्नवत असलेले यश आणि आनंद मिळवून देणार आहे, तर मग चला प्रवासास सुरुवात करू या….

या पुस्तकात प्रामुख्याने लेखकाला स्वत:ला आलेले नैराश्य पळवून लावण्यासाठी त्याने केलेले जोरदार प्रयत्न आणि कालांतराने त्यावर केलेली मात हे खरोखरीच विलक्षण असून, इतरांना प्रेरणात्मक ठरणारी अशीच बाब आहे. ‘‘हे पुस्तक पूर्णत: मनोवृत्ती या विषयावर आधारित आहे. या इंग्रजी पुस्तकाबद्दल येथे आवर्जून सांगावेसे वाटते की, वेळोवेळी आणि प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीस नमूद केलेली उदाहरणे, किस्से हे खूपच खुमासदार आणि मार्मिक असे आहेत. मनुष्याच्या जीवनात दृष्टिकोन किती महत्त्वपूर्ण काम करतो, हे पदोपदी लक्षात येते. ‘दृष्टिकोन म्हणजेच सर्वकाही’ आणि ‘तुमच्या दृष्टिकोनात बदल करा… आणि तुमचे जीवनच बदलेल!’ या दोन्ही उक्ती किती सार्थ आहेत, हे पुस्तक वाचताना लगेच पटते. ’’ – डॉ. मोहन उचगावकर हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

The Art Of Being Alone | Attitued Is Everthing | Drushtikon Mhanjech Sarvakahi द आर्ट ऑफ लेझिनेस | अ‍ॅटिट्यूड इज एव्हरिथिंग | दृष्टिकोन म्हणजे सर्वकाही ||

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like