Skip to product information
Audyogik Annapurna | औद्योगिक अन्नपूर्णा By Dr Malati Karwarkar | मालती कारवारकर
Rs. 100.00
Pages: 70
Language: Marathi

घर आहे, पण बहुतांश वेळ घराबाहेरच जातो. दोन वेळचं जेवणही घरात घेता येऊ नये, असा समाज आज मोठ्या संख्येनं आहे. कामाच्या ठिकाणी कँटीन असतं, म्हणून अनेकजण बाहेर जेवतात. परवडत नाही म्हणून रस्त्यावर उपलब्ध होणारं काहीतरी रिचवावं लागतं, असाही एक वर्ग आहे. परवडतं पण कामाचं स्वरूपच असं आहे, की दोन घास शांतपणानं बसून खाण्यासाठी वेळ नाही. या सर्वाचा परिणाम म्हणून पोट भरलेलं, पण अशक्त शरीर घेऊन वावरणारी माणसं आपण पाहतो. प्रत्येक बाबतीत बारीकसारीक विचार करून कंपन्यांची धोरणं ठरवणारं व्यवस्थापन उत्तम आहार आणि उत्तम चवीत गल्लत करतं; तर जेवण हा फक्त भूक लागल्यावर रिकाम्या झालेल्या पोटात ढकलण्याचा ऐवज आहे, अशा मानसिकतेनं बहुतेकांना घेरलेलं असतं.
आहार कसा असावा, किती असावा, कसा खाल्ला जावा, हे शास्त्र आहे. हे शास्त्र जीवनाची गुणवत्ता वाढवतं. पुढे आनंदी आणि निरोगी समाज जन्माला घालतं. यासाठी मूलभूत मार्गदर्शन करणारं हे पुस्तक !

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Audyogik Annapurna | औद्योगिक अन्नपूर्णा By Dr Malati Karwarkar | मालती कारवारकर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like