'प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वच लोकांना हे वाटत होतं की, मी तिथे नोकरीला लागल्याने माझ्या बायांच्या आयुष्यात खूप फरक पडलाय, त्यांची प्रगती झालीये, त्यांचं भलं झालंय. पण हे पूर्ण सत्य नाहीये, लेखमालिकेत निसटून गेलेला माझ्या जडणीघडणीचा भाग मी या पुस्तकात मांडलाय. जेवढा परिणाम माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात झाला, त्यापेक्षा कैकपटीने जास्त माझ्या आयुष्यात झाला. आत्मसन्मान आणि नैराश्याने भरलेल्या माझ्या आयुष्याला त्यांनी पाठीचा कणा दिला, संघर्षाचं बळ दिलं. माझा अतिशय खचलेला, आतला पैलू मी 'सुरवंट मधून मांडलाय. ते लिहिताना मला धाडस लागलं, पोटात कालवाकालव झाली, पण वाटलं लिहू या... कारण हा प्रवास केवळ माझ्या बायांचाच नव्हता. आमच्या विदर्भात सर्वांत कोरड्या, उष्ण भागातही जे झाड तग धरून उभं राहते ते म्हणजे बाभूळ, त्याला स्वतः चं अस्तित्व टिकवता येतं... अगदी माझ्या बायांसारख "
Pickup available at HO
Usually ready in 24 hours