Skip to product information
Bai Harat Nasate | बाई हरत नसते By Aiśvarya Pāṭekara |  ऐश्वर्य पाटेकर
Rs. 520.00
Pages: 328
Language: Marathi

झुंज या एकाच शब्दात या पुस्तकाचे वर्णन करता येईल. एका निरक्षर आणि निराधार माउलीने थकणारे हात अन् अभंग मनोबल यांच्या बळावर, आपल्या लहानग्यांच्या सोबतीनं सर्व प्रकारच्या संकटांशी झुंज दिली आहे. आणि संकटांनाच पराभूत केले आहे. तिने झुंज दिली भुकेशी... दारिद्र्याशी... नियतीशी... नात्यागोत्यातील माणसांशी... नवरा म्हणून जीवनात आलेल्या नराधमाशी... जीवापाड सांभाळण्याचा प्रयत्न करूनही विसकटून गेलेल्या संसाराला चूड लावणाऱ्या साऱ्या विपरीततेशी. 'जो दुःखाने दुःखी होत नाही, तो दुःखाला दुःखी करतो' या कविवचनाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे श्रमदेवता म्हणून पुजावी, अशी ही लेखकाची आई. शस्त्राचं बळ, संपत्तीचं बळ, शब्दांचं बळ यापेक्षाही आत्मबळ किती श्रेष्ठ आणि शाश्वत असते याचा साक्षात्कार घडवणारे हे लेखन. यातील शब्दाला घामाचा सुगंध आहे. प्रेमाचा ओलावा आहे. त्यागाचा स्पर्श आहे. आणि समर्पणाचे तेज आहे. 'आई' या शब्दाचे विस्तारलेले तेजस्वी आभाळ म्हणजे हे पुस्तक. निवडक प्रसंगांचे संयतपणे केलेले काव्यात्म चित्रण हे ऐश्वर्य यांच्या या लेखनाचे शक्तिस्थान आहे.
- डॉ. द. ता. भोसले

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Bai Harat Nasate | बाई हरत नसते By Aiśvarya Pāṭekara | ऐश्वर्य पाटेकर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like