{"product_id":"bharatacha-pradeshik-bhugol","title":"भारताचा प्रादेशिक भूगोल | Bharatacha Pradeshik Bhugol","description":"\u003cp\u003eभारत हे आशिया खंडातील एक प्रमुख राष्ट्र असून, त्याचा भौगोलिक विस्तार खूप मोठा आहे. आशिया खंडाच्या दक्षिणेस हिमालय पर्वतरांगांमुळे हा भाग आशियाच्या मुख्य भागापासून वेगळा दिसतो. हा भाग आशियाचा उपखंड म्हणून ओळखला जातो. या उपखंडाचा बहुतांश भाग भारताने व्यापलेला असल्यामुळे यास ‘भारतीय उपखंड’ असे म्हणतात. भारताचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ. कि. मी. असून, भारताने जगाच्या २.४६ टक्के एवढा भाग व्यापलेला आहे. जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया, कॅनडा, चीन, संयुक्त संस्थाने, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, यानंतर भारताचा सातवा क्रमांक लागतो. भारतीय उपखंड एक विस्तृत भूमी असून, उत्तरेस उंच हिमालय पर्वत, दक्षिणेस द्वीपकल्पीय पठार, हिमालय पर्वत व पठारादरम्यान गंगा-सिंधूचा मैदानी प्रदेश, पूर्वेस पूर्व घाट, पश्चिमेस सह्याद्री पर्वत आणि पूर्व व पश्चिम किनार्‍यालगत मैदानी प्रदेश आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले असून, नैर्ऋत्येस थरचे वाळवंट, पूर्वेस बंगालचा उपसागर, पश्चिमेस अरबी समुद्र व दक्षिणेस हिंदी महासागर आहे. सदरील पुस्तकात भारताचा परिचय, भारताची प्राकृतिक रचना, भारताची जलप्रणाली, भारताचे हवामान, भारतातील मृदा, भारतातील वनस्पती इत्यादी विषयांचा साध्या, सोप्या व परिणामकारक भाषेत मांडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला असून, प्रस्तुत पुस्तकात योग्य ठिकाणी नकाशे, आकृत्या, तक्ते आणि महत्त्वाचे प्रश्न यांचा समावेश केलेला आहे. प्रस्तुत पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा तसेच नेट\/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल, असाही प्रयत्न केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281414844499,"sku":"9.78936E+12","price":263.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bhartacha_20pradeshik_20bhugol_Pune_front.jpg?v=1795505379","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bharatacha-pradeshik-bhugol","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}