प्राचीन भारतीय विद्वानांना खगोल, भूगोल व ज्योतिषशास्त्राचे ज्ञान चांगलेच अवगत होते. सूर्य, चंद्र, पृथ्वी, नक्षत्र, ब्रह्मांड याविषयी त्यांनी सखोल अध्ययन करुन त्यासंबंधीचे विवरण विविध ग्रंथांमध्ये आढळून येते. पृथ्वीवरील पृथ्वीची रचना, स्थिती, सागर, महासागर, महाद्विप, पर्वत, ऋतू परिवर्तन, वायूमंडळ, वातावरण, ग्रहणे, भूकंप, ज्वालामुखी, अरण्ये यासंबंधीचे ज्ञान भारतीय प्राचीन विद्वानांनी अनेक ग्रंथ व पुराणांमध्ये उद्धृत केलेले आहे. वेद, पुराणे, उपनिषदे, रामायण, महाभारत, जैन व बौद्ध ग्रंथ, ब्राह्मणग्रंथ यासारख्या प्राचीन भारतीय ग्रंथ साहित्यातून समग्र, ब्रह्मांड, विज्ञान, खगोल, ज्योतिष, गणितीय भूगोल, ऐतिहासिक भूगोल यासंबंधीचे विवेचन आढळून येते. भारतीय भौगोलिक विचारधारा प्राचीन वैदिक काळापासून (इ. स. पूर्व २५००) विकसित झालेली आहे. प्राचीन भौगोलिक साहित्य उपरोल्लेखित ग्रंथ-पुरणांमधून ज्ञात होते. याच प्राचीन भारतीय साहित्याचा आधार घेऊन अनेक भिन्न-भिन्न प्रदेशातील विद्वानांनी भौगोलिक विचारधारेला आपापल्या स्तरावर विकसित केलेले आहे. इतके प्रभावशाली, प्रगत व वैज्ञानिक कसोटीवर आधारलेले प्राचीन भारतीय भौगोलिक ज्ञान हे मौलिक स्वरुपाचे आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours