भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्व परंपरेनेच कृषी आधारित किंवा ग्रामीण आधारित अर्थव्यवस्था आहे. वैदिक, मौर्य किंवा इतरही काळात भारतीय अर्थव्यवस्थेत शेती, व्यापार आणि राज्याची भूमिका यावर भर देण्यात आला होता. भारताच्या अनेक धर्मग्रंथात अर्थविषयक विचार आहेत. त्याचप्रमाणे गौतम तसेच शालीहोत्र यांचे कृषी अर्थशास्त्रविषयक विचार, पराशराचे कृषीसंग्रह आणि विधी राज्याचे व्यापार विषयक विचार महत्त्वपूर्ण आहेत. भारताच्या आर्थिक विचारवंतांमध्ये कौटिल्य, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, आर. सी. दत्त, पंडित नेहरू, अमर्त्य सेन, गोपाळ कृष्ण गोखले इत्यादींनी आपल्या आर्थिक विचारांनी अर्थशास्त्राला समृद्ध केले आहे. या सर्व भारतीय आर्थिक विचारवंतांचा अभ्यास प्रस्तुत पुस्तकात मुद्देसूद पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours