भारतीय भाषांमधून रामकथेचा जो विस्तार झाला त्याचे मोठे मनोज्ञ दर्शन या ग्रंथातून घडते. यातून दक्षिण भारतातील रामकथेचे जे विवेचन आले आहे ते मोठेच मनोरम स्वरूपाचे आहे. उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी संत सारस्वत शंकर महाराज यांच्या अभंग रामायणाचा परिचय उभ्या महाराष्ट्राला थक्क करून सोडील असा आहे. गोस्वामी तुलसीदासांचा सविस्तर परिचय या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य मानावे लागेल. खरे तर हा ग्रंथ एक त्रिवेणी संगम आहे कारण की यात एकूण तीन ग्रंथांचे एक सार्थ चित्रण आले आहे. एकतर जगभरच्या रामकथेला परिक्रमा करणारा हा ग्रंथ आहे. दुसरा ग्रंथ गोस्वामी तुलसीदास यांचा सर्वागिण परिचय करून देतो. तिसरा ग्रंथ आहे रामरायाच्या विविध रूपांचे दर्शन घडवण्याचा. महात्मा गांधीजींचा प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी तलस्पर्शी अभ्यास केलेला आहे. - विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड
Pickup available at HO
Usually ready in 24 hours