{"product_id":"bhartamadhye-vidnyan-va-tantrajnyanacha-vikas","title":"भारतामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास | Bhartamadhye Vidnyan Va Tantrajnyanacha Vikas","description":"\u003cp\u003e‘भारतामधील विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास’ या संदर्भग्रंथात एकूण सहा प्रकरणांचा समावेश असून विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा परिचय करून देत प्राचीन भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणिताची सुसुत्रता आणलेली आहे. भारतीय ज्ञानाचे स्त्रोत, चरक,सुश्रूत, आर्यभट्ट, वराहमिहीर, ब्रम्हगुप्त, भास्कराचार्य यासांरखे वैज्ञानिक गणितज्ञ व जगदीशचंद्र बोस, प्रफुल्लचंद्र रे, सी.व्ही.रामण, होमी जहांगिर भाभा, सत्येंद्रनाथ बोस या शास्त्रज्ञांच्या योगदानाची पावतीच जणू तयार झाली आहे. भारतातील विज्ञान तंत्रज्ञानाने जगाची नजर आकर्षिली आहे. बुध्दीवादी युगाच्या कंगोर्‍यातून परंपरेची हितावह संगत लेखक या लेखनातून स्पष्ट करतात. मोहोन-जोदरो, हडप्पा, दायमाबाद यापेक्षाही प्राचीनत्व घेऊन येणारी खान्देशातील सावळदे संस्कृती व पाटणच्या भूक्षेत्रावरील भास्कराचार्यांसारखे गणितज्ञ लिलावती सारख्या दस्ताऐवजांमधून आपलेपणाची रिघ यांनी मांडलेली असल्यामुळे ज्ञानप्रवाहातील पहिल्या प्रवाहाचा परिचय कल्पकतेने करून दिलेला आहे. नव्या पिढीला तथा शाळा महाविद्यालयांतील युवकांना नवी दृष्टी प्रदान करण्यासाठी भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास जाणून घेण्यासाठी या संदर्भग्रंथांचा निश्चितच उपयोग होईल.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281398132819,"sku":"9.78936E+12","price":206.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bhartamadhe_20Vidnyan_20Va_20Tantradnyanacha_20vikas_20front.jpg?v=1795505193","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bhartamadhye-vidnyan-va-tantrajnyanacha-vikas","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}