Skip to product information
'प्राक्तनाचे संदर्भ' आणि 'बरेच काही उगवून आलेले' या कवितासंग्रहांनंतर मौज प्रकाशन गृहातर्फे प्रकाशित होत असलेला 'भरून आलेले आकाश' हा द० भा० धामणस्कर यांचा नवा कवितासंग्रह.
हा कवितासंग्रह वाचताना शीर्षकापासूनच निसर्गाची चाहूल आपणांस लागते आणि कवितेकवितेगणिक ती गडद होत जाते.
निसर्गाची बहुविध रूपे, स्थित्यंतरे आपल्या डोळ्यांपुढून सरकत जाताना आपणही आपले राहत नाही-निसर्गच होऊन जातो !
बालकवींनंतर एवढी भावोत्कट, समृद्ध निसर्गकविता लिहिली ती द० भा० धामणस्कर यांनीच !
Pickup available at HO
Usually ready in 24 hours