{"product_id":"bhatkanti-saptarangi-betanchi","title":"भटकंती सप्तरंगी बेटांची | Bhatkanti saptarangi betanchi","description":"\u003cp\u003eकोणतंही बेट म्हटलं की आपलं कुतूहल चाळवतं आणि जगात तर अशी अनेक बेटं आहेत जी अक्षरश : स्वप्ननगरी वाटावीत … अशाच काही अनोख्या आणि अपरिचित बेटांची आपल्याला सैर घडवून आणत आहे प्रधान दाम्पत्य ! विशेष गर्दी नसलेल्या पण वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या बेटांवर जाऊन राहणं , तेथील निसर्ग भरभरून अनुभवणं , तेथील स्थानिक खाद्य – पेयांचा आस्वाद घेणं , घेणं तेथील वेगळी संस्कृती , प्रथा समजून हा प्रधान दाम्पत्याचा आवडीचा उद्योग …. गाठीला असलेला हा अनुभव रसिक वाचकांसमोर खुला करून प्रधान ती बेटं , तो प्रदेश डोळ्यासमोर उभा करतात . अशा तऱ्हेच्या फिरण्यातून पर्यटनाचा एक वेगळा आनंद कसा मिळू शकतो याची एक नवी दृष्टी ते पर्यटकांना भटकंती सप्तरंगी बेटांची या पुस्तकातून देतात . कोणत्या बेटांची सफर आहे या पुस्तकात ? | ऐकलं आहे का तुम्ही या बेटांबद्दल ? . स्पेनमधले बॅलेॲरिक आणि कॅनरी आयलंडचे अप्रतिम समुद्रकिनारे ११५ लहान – मोठ्या बेटांचा समूह सेशेल्स जागतिक पर्यटकांचं हॉट डेस्टिनेशन हवाई बेटं ग्रीस मधली पांढरी निळी बेटं लहान – मोठ्या १७,५०० बेटांचा मिळून झालेला व प्राचीन वारसा लाभलेला इंडोनेशिया नयनरम्य निसर्गसौंदर्याने नटलेली इटलीमधील लोकप्रिय बेटं … अशा अनेक बेटांची सप्तरंगी सफर …\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232524267603,"sku":"978-93-92374-41-8","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BhatkantiSaptarangiBetanchiFront-1.jpg?v=1795070431","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bhatkanti-saptarangi-betanchi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}