Skip to product information
Bramhand | ब्रम्हांड by Mohan Apte | मोहन आपटे""
Sale price  Rs. 248.00 Regular price  Rs. 275.00
Author: Mohan Apte
Pages: -
Language: Marathi

Bramhand | ब्रम्हांड विश्व ही एक भव्य कलाकृती आहे. ते एक अलौकिक पण अमानवी नाट्य आहे. अशा या नेत्रदीपक नाट्याचा सूत्रधार कोण बरं असेल ? विश्व नावाच्या देदीप्यमान कलाकृतीचा कर्ता कोण ? विज्ञानाला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. पण विश्वचं ओझरतं दर्शन मात्र विज्ञानाला झालं आहे. विश्व नावाच्या अदभुत कोड्याचा उलगडा हळूहळू होत आहे.

महास्फोटातून आपलं हे अफाट विश्व जन्माला आलं. आणि अतिप्रचंड वेगानं ते विस्तारू लागलं. चार बलांचा आणि मूलकणांचा अगम्य खेळ म्हणजे हे अमर्याद विश्व हे विज्ञानाला उमगलं. विश्वाचं एकेक गूढ महतप्रयासानं उलगडू लागलं. विश्व सपाट आहे की वक्र ? ते बंद आहे की खुलं ? बिंदुवत् स्थितीनं विश्चावाचा अंत होईल ? की निरंतर विस्तारणारं विश्व विरून जाईल ?

विश्वामधील मानवाचं आगमन ही नैसर्गिक घटना आहे. की मानवनिर्मितीसाठी विश्वाचा उपक्रम आहे ? प्रश्र्नांची ही शृंखला निरंतर वृद्धिंगत होत आहे. आजपर्यंत विश्वाचं किती ज्ञान आपण हस्तगत केलं ? अजून काय काय समजायचं बाकी आहे ? खरं म्हणजे विश्वाचं कोडं मानवाला उलगडेल ? या सा-या प्रश्नांचा धावता आढावा हीच, या ग्रंथाच्या उपक्रमाची मूलप्रेरणा. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

ब्रम्हांड | Bramhand

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like