{"product_id":"breakout-trading-made-easy-marathi-by-sunil-gurjar-poonam-chhatre","title":"Breakout Trading Made Easy (Marathi)| ब्रेकआउट ट्रेडिंग मेड इझी (मराठी) By  Sunil Gurjar, Poonam Chhatre | सुनील गुर्जर ,  पूनम छत्रे","description":"\u003cp\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eशिकण्यासाठी सोप्या असलेल्या ब्रेकआउट ट्रेडिंगच्या तंत्रांच्या आधारे स्टॉक मार्केटमध्ये अधिक यश मिळवा!\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eलोकप्रिय लेखक सुनील गुर्जर यांच्या ‘ब्रेकआउट ट्रेडिंग मेड इझी’ पुस्तकाच्या साहाय्याने ट्रेडिंगच्या यशस्वी प्रवासासाठी तयार व्हा. ट्रेडिंगच्या धोरणांमध्ये चार्ट पॅटन्सर् किती महत्त्वाचे असतात, हे गुर्जर यांनी स्वतःच्या ट्रेडिंग अनुभवांच्या आधारे या पुस्तकात सांगितले आहे. या तंत्रांच्या मदतीने त्यांनी स्वतःच्या भांडवलात अनेकपट वाढ केली; तसेच बाजारातील मंदीच्या किंवा सतत चढउतारांच्या काळात स्वतःचे संरक्षणही केले.\u003cbr\u003eब्रेकआउट ट्रेडिंगचे अनेक महत्त्वाचे पैलू या पुस्तकातून जाणून घेता येतात. सपोर्ट आणि रेझिस्टन्स् हे गुर्जर यांच्या धोरणाचे प्रमुख आधार आहेत. कँडलस्टिक चार्टस् आणि प्रत्यक्ष उदाहरणांच्या साहाय्याने त्यांनी योग्य ब्रेकआउट कसा शोधायचा आणि खोटा ब्रेकआउट कसा ओळखायचा, हे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.\u003cbr\u003eब्रेकआउट ट्रेडिंगची समग्र माहिती देणारे हे पुस्तक किमतीचे योग्य उद्दिष्ट ठरवणे, धोरणात्मक स्टॉप-लॉस लावणे, जोखीम व्यवस्थापन करणे आणि जास्तीतजास्त फायदा मिळवणे यांसारखी महत्त्वाची कौशल्ये शिकवते. काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या या तंत्रांमुळे तुम्हाला स्टॉक्स्चे व्यवहार करताना आत्मविश्वासाने आणि संपूर्ण माहितीच्या आधारे निर्णय घेता येतील.\u003cbr\u003eतुमच्या ट्रेडिंग प्रवासाचा कायापालट करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? सुनील गुर्जर (CFTe, CMT) हे ‘मेक मनी विथ प्राइस अॅक्शन ट्रेडिंग’ या राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत. मुंबईतील वित्तीय शिक्षण आणि सेवा देणार्या ‘चार्टमोजो’ या संस्थेचे ते संस्थापक आहेत. ते पूर्णवेळ शेअर बाजारात ट्रेडिंग करतात आणि चार्ट विश्लेषणातील तज्ज्ञ आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eखेळण्याच्या वयात कोकच्या ६ बाटल्यांचा संच विकून ५ सेंट्सचा स्वकष्टार्जित नफा मिळवणाऱ्या वॉरन यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर जगातील अनेक लोकांनी कमावली आहे. मग वॉरनने यात जगावेगळं असं केलं तरी काय ?\u003cbr\u003eकुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, व्यवसायजगतात सहसा दुर्मीळ असणाऱ्या नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणाऱ्या फार कमी व्यक्ती असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी ९० टक्के संपत्ती फारसा गाजावाजा न करता समाजाला परत देणं, हेच वॉरनच्या यशाचं वेगळेपण आहे.\u003cbr\u003e'समभागधारक हेच कंपनीचे मालक' अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांनाही यशाचं क्षितिज दाखवणाऱ्या वॉरनकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत. त्या साऱ्या वाचकांसमोर अलगद उलगडणारं हे पुस्तक!\u003cbr\u003e\u003cbr\u003eविशेष म्हणजे वॉरनने सांगितलेल्या श्रीमंत होण्याच्या १० मार्गांसह!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67607426760787,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71Jkla_4btL._SL1500.jpg?v=1791272843","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/breakout-trading-made-easy-marathi-by-sunil-gurjar-poonam-chhatre","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}